कोल्हापूर : राष्ट्रवादी काॅंग्रेसला पक्षाच्या महिला आघाडीच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा, माजी खासदार निवेदिता माने यांनी बुधवारी रामराम ठोकला. तर त्यांचे पुत्र धैर्यशील यांनी मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेकडून आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे धैर्यशील माने यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार यांनी ताज्या कोल्हापूर दौऱ्यात हातकलंगले मतदार संघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांना सोडणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे माने गटात मोठी नाराजी पसरली होती. माने गटाने राजकीय पर्याय शोधण्यास सुरुवात केली होती.

sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप
jayant patil govinda eknath shinde
“चालणारा नट…”, गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावरून जयंत पाटलांचा टोला; म्हणाले, “त्यांचा शेवटचा चित्रपट…”
chetan narke, kolhapur lok sabha, chetan narke shivsena
हातकणंगलेतून लढण्याचा शिवसेनेच्या प्रस्तावाला नकार; कोल्हापुरात लढणारच – डॉ. चेतन नरके

त्यातून त्यांनी शिवसेनेला पसंती दिली. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. याचवेळी हातकणंगले मतदारसंघातील लोकसभेची उमेदवारी देणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले असल्याचे धर्यशील यांनी नमूद केले. यावेळी हातकणंगले मतदारसंघातील उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील हे तीनही सेनेचे आमदार उपस्थित होते.

निवेदिता मानेही सेनेच्या वाटेवर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा माजी खासदार निवेदिता माने यांनी आज दिला. पक्षाचे नेते शरद पवार यांना पाठवलेल्या दोन ओळीच्या पत्रात त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामाही देत असल्याचे नमूद केले आहे. आता त्या सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माने गटाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्या पुढील महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील, असे धैर्यशील माने यांनी ;लोकसत्ता’ला सांगितले.

फोटो – माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.