News Flash

‘शिवकाळाचा अमूल्य खजिना अनुभवला’, बाबासाहेब पुरंदरेंना भेटल्यानंतर अमोल कोल्हे भावुक

अमोल कोल्हे यांनी बाबासाहेब पुरंदरेंना भेट दिलं शिवगंध हे पुस्तक

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज दिवाळीनिमित्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवगंध हे पुस्तक बाबासाहेब पुरंदरे यांना भेट म्हणून दिलं. तसेच बाबासाहेब पुरंदरे यांनी खासदार अमोल कोल्हे यांना छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती हे पुस्तक दिवाळी भेट म्हणून दिलं. फेसबुक पोस्ट आणि ट्विट करत अमोल कोल्हे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे?
आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची दिवाळीनिमित्त भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यानिमित्ताने शिवकाळाचा अमूल्य ओघवता खजिना पुन्हा अनुभवता आला. शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसंस्कार सृष्टी या प्रकल्पाची माहिती घेऊन या संकल्पनेचे बाबासाहेब पुरंदरे यांनी भरभरुन कौतुक केले. स्वराज्यजननी जिजामाता मालिका, आगामी चित्रपट यावर मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या प्रसंगी शिवगंध हे पुस्तक त्यांना भेट म्हणून दिले. तर त्यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती हे पुस्तक दिवाळी भेट म्हणून मिळाले. वयाचे शतक साजरे करणाऱ्या एका आदरणीय शिवप्रमेचीच्या सहवासातील हा अविस्मरणीय दिवाळसण अशाही भावना अमोल कोल्हेंनी व्यक्त केल्या.

दरम्यान जगदंब क्रिएशन्स पुढच्या टप्प्यावर चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवणार असल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं होतं. ‘शिवप्रताप’ नावाच्या चित्रपट शृंखलेअंतर्गत वाघनखं, वचपा आणि गरुडझेप अशा तीन चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार आहेत. हे तिन्ही चित्रपट केवळ मराठीतच नव्हे, तर हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 9:54 pm

Web Title: experienced invaluable treasures shivaji maharaj period says amol kolhe who visited babasaheb purandare scj 81
Next Stories
1 महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण १६ लाखांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त
2 बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी साखरसम्राट रत्नाकर गुट्टेंच्या मुलाला अटक
3 ‘असले प्रश्न संजय राऊतांना विचारा’ म्हणत चंद्रकांत पाटील यांचं स्मित हास्य
Just Now!
X