लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : करोना आपत्तीमुळे राज्यात शाळा सुरू होण्याचा निर्णय अद्यााप झाला नाही. दहावी, बारावीच्या विद्यााथ्र्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अमरावती विभागात ५ ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर वर्ग सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक वर्ग भरवण्यात येणार असून, हा प्रयोग यशस्वी झाल्यास सर्वत्र दहावी, बरावीचे वर्ग सुरू करण्यात येतील, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुरू होण्यास अडचणी आल्या आहेत. या परिस्थितीचा सामना करण्यासोबतच शिक्षण सुरू करणे आवश्यक आहे. खासगी शाळांनी सर्व वर्गांचे ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहेत. यामुळे खासगी आणि शासकीय शाळांतील विद्यााथ्र्यांमध्ये शैक्षणिक विषमता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणून पहिल्या टप्प्यात दहावी आणि बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहे. यामध्ये अमरावती विभागात येणाऱ्या पाच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शिक्षण विभागाने दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने तयारीला प्रारंभ केला. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा अभिप्राय घेण्यात येणार आहे. यासाठी त्रयस्थ म्हणून गावातील सरपंच किंवा समिती सदस्यांची मदत घेतली जाणार आहे. अमरावती विभागातील हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर ठिकाणीही त्याची अंमलबजावणी करून दहावी व बारावीचे वर्ग भरवण्यात येतील. सद्यास्थिती लक्षात घेता इतर वर्गाच्या शाळा ऑनलाइन सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

लाखावर विद्यार्थ्यांकडे सुविधा नाही
“अमरावती विभागात सुमारे एक लाख १९ हजार विद्यााथ्र्यांकडे ऑनलाइन शिक्षणाची सुविधा नाही. त्यांना कुठल्या पद्धतीने शिक्षण देता येईल, यावर चर्चा करून विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. प्रत्यक्ष शिक्षण पद्धती इतर कोणत्याही पर्यायापेक्षा जास्त प्रभावी आहे. अमरावती विभागात प्रायोगिक तत्त्वावर दहावी व बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर ठिकाणीही वर्ग सुरू करण्यात येतील.”
– बच्चू कडू, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), महाराष्ट्र राज्य.

“दहावी व बारावीचा प्रत्येक तालुक्यात एक वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. निर्देशानुसार प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष वर्ग सुरु होतील.”
– प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, अकोला.