News Flash

आयातीऐवजी ८० लाख टन साखरेची निर्यात करावी

वस्तुविनिमय पद्धतीने आयात शुल्कमुक्त व्यापार योजनेनुसार अपेडाने साखर आयातीला परवानगी दिली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार

शरद पवार यांची पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिवांशी विविध प्रश्नांवर चर्चा

श्रीरामपूर : चकोमा एक्स्पोर्ट्स या कंपनीने पाकिस्तानातून अवघी ४ हजार ७०० टन साखर आयात केली आहे. आयातीचे हे प्रमाणे नगण्य असले तरी पाकिस्तानबरोबरच्या संबंधांमुळे हा विषय संवेदनशील बनला आहे. दरम्यान, आज माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिवांशी साखर धंद्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी ८० लाख टन साखरेची सरकारने निर्यात करावी, अशी मागणी करण्यात आली.

वस्तुविनिमय पद्धतीने आयात शुल्कमुक्त व्यापार योजनेनुसार अपेडाने साखर आयातीला परवानगी दिली होती. ही साखर केवळ चकोमा एक्स्पोर्ट्सला प्रक्रियेकरिताच वापरण्याचे बंधन होते. मात्र ही साखर बाजारात आल्याने घोटाळा झाला.  याची चौकशी झाल्यास चकोमा एक्स्पोर्ट्सच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानांचे प्रमुख सचिव नृपेन मिश्रा यांच्यासमोर आज साखर उद्योगातील समस्या मांडण्यात आल्या. कृषिमंत्री शरद पवार यांच्या दिल्ली येथे निवासस्थानी झालेल्या बैठकीस राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. यंदा व पुढीलवर्षी विक्रमी उत्पादन होणार असून ५ कोटी ऊस उत्पादक व ५३० कारखाने संकटात सापडले आहेत. त्यांना मदतीचा हात न मिळाल्यास परिस्थिती गंभीर होऊन हाताबाहेर जाऊ  शकते, असा इशारा देण्यात आला.

साखर दरात स्थिरता आणण्यासाठी सध्या ५५ रुपये प्रतिटन ऊस उत्पादन प्रोत्साहन रकमेमध्ये दुपटीने वाढ करावी. पुढील १८ महिन्यांसाठी किमान ८० ते ९० लाख टन साखर निर्यात करावी. शेजारील देशामध्ये सरकारी माध्यमाद्वारे पांढरी व कच्ची साखर निर्यात करावी. वित्तीय संस्थांनी नियमात शिथिलता आणावी. रिझव्‍‌र्ह बँक व नाबार्डने कर्जाची पुनर्बाधणी व मुदतवाढ द्यवी. ऊस दरासाठी नव्याने आर्थिक मदत करावी. इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देऊन प्रतिटन ५३ रुपये दर निश्चित करावा. ५० लाख टन साखरेचा साठा तयार करावा. प्रत्येक महिन्याला साखर विक्रीची कोटापद्धत सुरू करावी. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने या प्रश्नात तातडीने लक्ष घालून सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 2:25 am

Web Title: export 80 million tons of sugar instead of import says sharad pawar
Next Stories
1 खासगी शाळांमधील विना‘टीईटी’ शिक्षक अपात्र?
2 सोलापुरात भाजपमध्ये जल्लोष अन् अस्वस्थताही
3 खामगांवमध्ये दोन गटांत हाणामारी
Just Now!
X