13 August 2020

News Flash

‘फेसबुक फ्रेंड’ने केला घात, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अखेर पीडितेने पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात बलात्काराची तक्रार दिली.

फेसबुकद्वारे ओळख झालेल्या तरुणाने १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. मानकापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी हा फुड कंपनीत डिलीव्हरी बॉय आहे.

पीडित मुलीला तरुणाने फेसबुकवरुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. फेसबुकवर त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. कालांतराने या मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले. तरुणाने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते. काही दिवसांनी दोघेही भेटले. आरोपी पीडित मुलीला घेऊन स्वत:च्या घरी गेला. तिथे त्याने पीडितेवर बलात्कार केला. यानंतर तो वारंवार पीडित मुलीला आईवडिलांना प्रेमसंबंधांची माहिती देतो अशी धमकी द्यायचा आणि तिचे शोषण करायचा. पीडितेने तरुणाकडे लग्नाचा तगादा लावला त्याने पीडितेशी संपर्क तोडला. अखेर पीडितेने पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात बलात्काराची तक्रार दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2019 6:00 pm

Web Title: facebook friend rape minor girl in nagpur on pretext of marriage
Next Stories
1 विनयभंगाप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटेंना अटक
2 मराठा विद्यार्थ्यांचं आंदोलन १५ दिवसांनंतर मागे
3 दुर्दैवी ! उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडिलांचा मुलगा आणि पुतण्यासह बुडून मृत्यू
Just Now!
X