27 September 2020

News Flash

जिल्हा बँकेच्या खातेदारांना राष्ट्रीयीकृत बँकांच्या सुविधा

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खातेदारांना आता देशभरात कुठेही आर्थिक व्यवहार करता येईल. कोअर बँकिंग प्रणालीमुळे पशांची देवाण-घेवाण करण्याची तत्काळ सुविधा बँकेने उपलब्ध केली आहे.

| May 29, 2014 01:10 am

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खातेदारांना आता देशभरात कुठेही आर्थिक व्यवहार करता येईल. कोअर बँकिंग प्रणालीमुळे पशांची देवाण-घेवाण करण्याची तत्काळ सुविधा बँकेने उपलब्ध केली आहे.
मागील ६ महिन्यांपासून जिल्हा बँकेत कोअर बँकिंग प्रणाली सुरू करण्यात आली. परभणी, िहगोली जिल्ह्यांतील ग्रामीण-शहरी भागात जिल्हा बँकेच्या १०३ शाखा ऑनलाईन झाल्या. त्यामुळे बँकेच्या व्यवहाराला गती मिळाली आहे. आता बँकेने आणखी प्रगती करत एक पाऊल पुढे टाकत इतर बँकांप्रमाणेच पशाची देवाण-घेवाण करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. आरटीजीएस व नीफ्ट प्रणालीमुळे देशात कोठेही जिल्हा बँकेच्या खातेदारांना पशाची देवाण-घेवाण करता येईल. त्यामुळे खातेदारांना आपली रक्कम त्याच दिवशी मिळणार आहे. शिक्षक, कर्मचारी, कंत्राटदार, शेतकरी, विद्यार्थी आदींना राष्ट्रीयीकृत व खासगी बँकेप्रमाणेच विविध बँकिंग सुविधेचा लाभ मिळणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2014 1:10 am

Web Title: facilities in nationalised bank for district bank account holder
टॅग Parbhani
Next Stories
1 खासदार चंद्रकांत खैरेंची पोलिसांना शिवराळ धमकी
2 आमगावात वनखात्याच्या बुलडोझरमुळे शेतकऱ्याचे धान नष्ट
3 जिल्ह्य़ात खतांचा मुबलक पुरवठा; काळाबाजार रोखण्यासाठी १६ पथके
Just Now!
X