बोईसर : बोईसर भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेऊन औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांनी घातक रासायनिक सांडपाणी थेट पर्जन्यजल वाहिन्यांमध्ये सोडण्यास सुरुवात केली आहे. या साऱ्या प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे.

पर्जन्यजल वाहिन्यांमध्ये रासायनिक पाणी सोडल्याने त्या तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे त्यातील सांडपाणी मुख्य रस्त्यावर तुंबल्याचे चित्र आहे. विषारी वायुने मिश्रित सांडपाण्याची सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना नाक मुठीत घेऊन येजा करावी लागत आहे. चार दिवस पावसाने पालघर जिल्ह्य़ाला झोडपले आहे. त्याचा फायदा कारखानदारांनी घेतला आहे.

पाऊस सुरू असल्याने त्यांचा फायदा घेत काही प्रदूषण करणारे कारखानदार रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट पावसाच्या पाण्यात सोडुन देत आहेत. परिणामी पावसाळी सांडपाणी निचरा होणारम्य़ा गटारांमध्ये संपूर्ण पणे रासायनिक सांडपाणी साचलेले पाहावयास मिळते. औद्य्ोगिक क्षेत्रातील प्रदुषणकारी कारखान्यांन विरोधात कितीही तRारी केल्या तरी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप अनेक वेळा नागरीकांनी केले आहेत. एखाद दुसरम्य़ा कारखान्यावर नोटीस बजावुन नंतर कायद्यच्या पळवाटा शोधुन कारखानदारांना प्रशासनाकडून मोकळीक दिली जात आहे.

औद्य्ोगिक क्षेत्रात रासायनिक सांडपाणी रस्त्यावर आले असताना देखील संबंधित कारखान्यांवर कारवाई तर सोडाच साधी चौकशी देखील केली जात नाही. पाऊस सुरू असल्याचे कारण देत चार दिवस झाले एकही क्षेत्रीय अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या तारापुर कार्यालयात फिरकाला सुध्दा नाही. यामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळ तारापुर मधील प्रदुषणावर किती गंभीर आहे ते समोर येते. नियमानुसार स्थानिक कामाच्या ठिकाणी अधिकार्म्यांना राहणे बंधनकारक असते. परंतु प्रदुषण नियंत्रण मंडळात काही अधिकारी कर्मचारी मुंबई ठाण्याहून येत असुन दुपारी १२ वाजता हजेरी कार्यालयात लावतात. मात्र अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई आजवर करण्यात आलेली नाही.

पास्थळ खाडीत सांडपाण्याचा पूर

पावसाचा जोर कायम असल्याने रासायनिक कारखानदारांनी सोडलेले रासायनिक सांडपाणी पावसाळी निचरा होणारम्य़ा गटारातुन थेट नैसर्गिक नाल्यात जात आहे. हेच नैसर्गिक नाले पास्थळ येथील खाडीला जोडलेले असल्याने संपूर्ण खाडी परिसरात रासायनिक पाण्याचा पुर निघालेला पाहावयास मिळाला.

राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

ओद्योगिक क्षेत्रातील काही भागात सांडपाणी पावसाळी पाणी पर्जन्यजल वाहिन्यात दिसून आले आहे. त्याबाबत संबंधित कारखानदारांची चौकशी करून कारवाई केली जाईल. तसेच पावसाचा जोर असल्याने क्षेत्रीय अधिकारी कार्यालयात येऊ शकले नसतील, परंतु त्यांनी उपस्थित राहण गरजेचे आहे. त्याबाबत त्यांना समज दिली जाईल.

-मनिष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी तारापूर एमआयडीसी