News Flash

सांगलीत जळालेल्या बनावट नोटा

इंग्लंडच्या बनावट नोटा अर्धवट जळालेल्या स्थितीत सांगलीच्या कत्तलखाना परिसरात रविवारी आढळून आल्याने पोलिसांची मात्र तारांबळ उडाली.

| July 27, 2015 04:59 am

इंग्लंडच्या बनावट नोटा अर्धवट जळालेल्या स्थितीत सांगलीच्या कत्तलखाना परिसरात रविवारी आढळून आल्याने पोलिसांची मात्र तारांबळ उडाली. अर्धवट जळालेल्या या नोटा एकाच क्रमांकाच्या असल्याने बनावट असल्याचे सिद्ध होत असले तरी त्यांचा खरेपणा तपासण्यासाठी नाशिकला धाडण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
आज सकाळी कत्तलखाना परिसरात एका व्यक्तीला ५० पौंडच्या बँक ऑफ इंग्लंडच्या आणि राणीचे चित्र असलेल्या नोटा सापडल्या. हे परकीय चलन बाजारात आणण्याच्या दृष्टीने कोणी प्रयत्न करीत आहेत की काय, अशी शंका आल्याने पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
या नोटांचा खरेपणा तपासण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 4:59 am

Web Title: fake note burn in sangli
टॅग : Sangli
Next Stories
1 दलितही नक्षलवाद्यांचे लक्ष्य
2 अहमदनगरमधील बालगृहातून पाच मुलींचे पलायन
3 नक्षल्यांचा घातपातासाठी अतिदुर्गम भागात स्फोटकांचा साठा
Just Now!
X