News Flash

PM Cares Fund च्या बनावट वेबसाइट; मुंबईसह पुण्यातील ७८ जणांवर गुन्हा

बनावट खात्यांपासून सावधान! 9 पेक्षा जास्त खोटे UPI ID

संग्रहित छायाचित्र

लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबरने धडक कारवाई केली आहे. लॉकडाऊनमध्ये राज्यातील विविध शहरात ७८ गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईसह पुण्यासारख्या प्रमुख शहरातील गुन्हागारांवर सायबर गुन्ह्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. PM Cares Fund च्या बनावट वेबसाइट तयार करून पैसा लुबाडत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सायबरने लोकांना सोशल मीडियावर पसरल्या जाणाऱ्या लिंकपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ज्यांना कोरोना महामारीच्या उपचाराकरिता देणगी द्यायची आहे त्यांनी भारत सरकारच्या pmcares फंड करता देणगी देताना pmcares@sbi या अधिकृत लिंकचाच वापर करावा, अशी विनंती सायबर सेलने केली आहे. pmcarefund@sbi, pm.care@sbi, pmcare@sbi, pncare@sbi ,pncares@sbi pmcares@pnb, pmcares@upi, pmcaress@sbi, pmcares@hdfc अशा प्रकारच्या खोट्या लिंक देऊन ऑनलाइन फसवुणुकीचा खोडसाळपणा सुरु केला आहे .तरी सर्व नागिरकांनी अशा खोट्या लिंकचा अजिबात वापर करू नये, असे अवाहनही सायबर सेलकडून करण्यात आले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमालावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करावे व कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत .महाराष्ट्र सायबर, या गुन्हेगारांना व समाजकंटकांना पकडण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर समन्वय साधून काम करत आहे. महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये ७८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबई ८, पुणे ग्रामीण ६, सातारा ६, बीड ५, नाशिक ग्रामीण ५,नागपूर शहर ४ ,नाशिक शहर ४, ठाणे शहर ४, कोल्हापूर ४ , गोंदिया ३, भंडारा ३ , जळगाव ३. सोलापूर ग्रामीण २,सिंधुदुर्ग २, पुणे शहर १(N.C) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

मुंबई सायबर सेल यांनी दोन तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. सदर तरुण फेसबुक पोस्ट द्वारे कोरोना महामारी वर अनुचित भाष्य करून व सदर पोस्ट द्वारे या महामारीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत होते .ज्यामुळे परिसरातील तसेच राज्यातील शांतीपूर्ण वातावरण बिघडण्याची स्थिती निर्माण करून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकत होता . तसेच अजून एका घटनेमध्ये, डोंगरी (मुंबई) भागातील काही तरुण whatsapp द्वारे जाणूनबुजून अफवा पसरणविण्याचे मेसेज फॉरवर्ड करत होते व एकत्र जमून लागू असलेल्या संचारबंदीचे पण उल्लंघन करत होते, त्यामुळे त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

मालेगाव (जि: नाशिक) येथे देखील काही तरुणांनी corona महामारीचे समर्थन आपल्या tiktok विडिओ वर करून, त्याला धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे परिसरातील व राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने मालेगाव पोलीसांनी सदर तरुणांचा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 5:53 pm

Web Title: fake pm cares links being used to dupe people maharashtra cyber police officials say nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “गोळ्या घालण्याची भाषा असंवैधानिक, जबाबदार राजकीय नेत्याला शोभत नाही ”
2 Lockdown: “गाडी कधी चालू होणार आहे, हो?”; बस स्थानकात अडकलेल्या गतिमंद महिलेची आर्त विचारणा
3 Coronavirus : महाराष्ट्रातील करोनाचा वेग वाढला; एका दिवसात ५५ जण आढळले संसर्गग्रस्त
Just Now!
X