News Flash

विहिरीत बुडून दोन मुलींचा मृत्यू

पाणी भरण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी तालुक्यातील रामपुरा गावात घडली. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात

| July 7, 2013 03:20 am

पाणी भरण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी तालुक्यातील रामपुरा गावात घडली. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आशाबाई भाऊसाहेब करांडे (११) आणि मन्याबाई काळू गोयकर (१०) अशी या दोन मुलींची नावे आहेत.  रामपुरा शिवारातील शेतात वास्तव्यास असणाऱ्या या मुली सकाळी दहाच्या सुमारास पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेल्या होत्या. त्या वेळी एकीचा तोल जाऊन ती पाण्यात पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरीही पाण्यात पडली.  या घटनेची माहिती समजल्यानंतर आसपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले; परंतु तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 3:20 am

Web Title: fall in well two girls died in maleaon
Next Stories
1 सिंधुदुर्ग नूतन जिल्हाधिकारीपदी ई. रवींद्रन
2 जात पंचायतीच्या विरोधात मोर्चा
3 शिधापत्रिकांऐवजी आता ‘स्मार्टकार्ड’ नवीन पद्धतीचा नागरिकांवरच बोजा
Just Now!
X