11 August 2020

News Flash

चाचणी अहवाल उशिरा आल्याने मृतदेह ६ दिवस पडून

अखेर सातव्या दिवशी म्हणजे बुधवार १ जुलै रोजी अहवाल आला.

प्रतिकात्मक फोटो

विरार : विरारमध्ये मरण पावलेल्या एका मुलाचा करोना चाचणी अहवाल येण्यासा तब्बल ६ दिवस लागले. तांत्रिक चुकीमुळे अहवाल येण्यास विलंब लागल्याचे रुग्णालयाने सांगितले. मात्र मयत मुलाचे कुटुंबीय तब्बल ६ दिवस अहवालाची वाट बघत रुग्णालयाबाहेर ताटकळत बसल्याने त्यांची मोठी परवड झाली.

विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील भाजी विक्री करणाऱ्या राजा गुप्ता या पंधरा वर्षीय मुलाचा २५ जून रोजी अकस्मात मृत्यू झाला होता. पुढील तपासणीसाठी विरार पोलिसांच्या विनंतीनुसार रुग्णालयामार्फत मृतदेहाची करोना चाचणी करण्यात आली. पण सहा दिवस उलटूनही मृतकाचा करोना अहवाल आला नसल्याने ६ दिवस हा मृतदेह रुग्णालयात पडून होता.

अखेर सातव्या दिवशी म्हणजे बुधवार १ जुलै रोजी अहवाल आला. त्यात या मुलाला करोनाची लागण झाल्याचे निदान झाले. अहवालाच्या प्रतीक्षेत मयत मुलाचे नातेवाईक रुग्णालयात जाऊन चकरा मारत होते. रुग्णालयाने करोना चाचणीत हलगर्जीपणा केल्याचा आरोप मयत मुलाचा भाऊ  अजय गुप्ता याने केला आहे.

या बाबत अधिक माहिती देताना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शंतनू कुंडगीर यांनी सांगितले की, रुग्णालयाच्या वतीने करोना चाचणीचे नुमने हे मुंबईत पाठवून देण्यात आले होते मात्र तेथील रुग्णालयातील काही तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा नुमने पाठवण्यास सांगण्यात आले. यामुळे अहवाल प्राप्त होण्यास उशीर झाला. मृतकाचा अहवाल सकारात्मक असल्याने वसई-विरार महापालिकेच्या नियमानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहवाल वेळेवर मिळत नसल्याने परवड

सध्या वसई-विरारमध्ये करोना चाचणी केंद्र नाही. यामुळे करोना चाचणी अहवालासाठी रुग्णांचे स्वॅब हे मुंबईत पाठवावे लागत आहेत. आणि चाचणी अहवाल येण्यासाठी ४८ तासांचा अवधी लागतो, कधी कधी हा अवधी दुपटीने तिपटीने वाढतो. यामुळे रुग्णांना अहवाल वेळेवर मिळत नसल्याने मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे सांगितले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 4:23 am

Web Title: family get dead body after six day due to late arrival of test report zws 70
Next Stories
1 आदिवासी जमिनींवर अतिक्रमण
2 शासन निर्णयाला जिल्हा परिषदेची बगल
3 तिवरेवासीयांचा जगण्यासाठी संघर्ष सुरूच 
Just Now!
X