News Flash

कुटुंबीयांचा प्रेमसंबंधांना विरोध, नांदेडमध्ये युगुलाची आत्महत्या

गुरुवारी पारसही एका लग्नानिमित्त गावात आला होता. त्यानंतर दोघांनी पारसचे आजोळ कासारवाडी गाठले आणि...

प्रतिकात्मक छायाचित्र

लातूर जिल्ह्यातील कोळनूर येथील प्रेमीयुगुलाने प्रेमाला घरातून होत असलेला विरोध सहन न झाल्याने नांदेडमधील मुखेड तालुक्यात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवारी दोघांचा मृतदेड झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

पारस निवृत्ती नरोटे (वय २५) व धनश्री माधव चोले (वय २०) हे दोघे नांदेड येथे राहत होते. पारस पोलीस भरतीची तयारी करत होता तर धनश्री ही खासगी महाविद्यालयात द्वितीय वर्षांत तंत्रशिक्षण घेत होती. मागील काही दिवसांपासून दोघांचे प्रेम जुळले होते. दोघांच्याही घरी या प्रकरणाची कुणकुण लागताच त्यांच्या प्रेमाला परिवारातून मोठा विरोध होऊ लागला.

दीड महिन्यांपूर्वी धनश्री कोळनूर या गावी परतली होती. गुरुवारी पारसही एका लग्नानिमित्त गावात आला होता. त्यानंतर दोघांनी पारसचे आजोळ कासारवाडी गाठले. शुक्रवारी दोघांनी खुशाल देवकत्ते यांच्या शेतातील चिंचेच्या झाडावर गळफास घेत आत्महत्या केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 11:23 am

Web Title: family oppose love marriage couple commits suicide in nanded
Next Stories
1 कारवाई टाळण्यासाठी तरुणाचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न
2 तुम्ही जामिनावर बाहेर आहात, किती बोलावं याचा विचार करा; मुख्यमंत्र्यांचा भुजबळांवर निशाणा
3 काश्मिरींवर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ कार्यकर्त्यांची युवासेनेतून हकालपट्टी
Just Now!
X