News Flash

बारामतीमधले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दादा साळुंखे यांची हत्या

दादा साळुंखे यांची हत्या का करण्यात आली यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही

बारामतीचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दादा साळुंखे यांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. 12 तारखेला उजनी धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या सोलापूर पुणे ब्रिजच्या खाली एक मृतदेह सापडला होता. या इसमाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली होती. हा मृतदेह दादा साळुंखे यांचाच असल्याची ओळख आता पटली आहे. घटनास्थळी टायरचे ठसेही दिसून आले आहेत.

दादा साळुंखे यांची हत्या करून त्यांचा मृतदेह या ठिकाणी आणून फेकला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हा मृतदेह जेव्हा पोलिसांना सापडला तेव्हा त्यावर असलेल्या शर्टच्या कॉलरवर Slikwera टेलर्स बारामती असा पत्ता पोलिसांना मिळाला. त्या अनुषंगानेच हा मृतदेह कोणाचा आहे याचा शोध पोलीस घेत होते. आता या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह बांधकाम व्यावसायिक दादा साळुंखे यांचा असल्याची माहिती समोर आली आहे.  दादा साळुंखे यांची हत्या करण्यामागे वैमनस्य होते की आणखी काही कारण? हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2018 11:40 am

Web Title: famous builder dada salunke murder in pune
Next Stories
1 अनियंत्रित वापरामुळेच पाणीपुरवठा बंद
2 दानशुरांमुळे मोडलेला संसार पुन्हा उभा..
3 मेट्रो मार्गिकेतील अतिक्रमणे हटवली
Just Now!
X