06 July 2020

News Flash

नांदेड जिल्ह्य़ात साडेचार हजार हेक्टर शेतीला गारपिटीचा फटका

गेल्या आठवडय़ात म्हणजे रविवारी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे ४ हजार ५६० हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. निशिकांत देशपांडे यांनी

| February 28, 2014 01:05 am

गेल्या आठवडय़ात म्हणजे रविवारी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे ४ हजार ५६० हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. निशिकांत देशपांडे यांनी दिली.
रविवारी राज्यातल्या अन्य काही भागांसह नांदेडमध्येही बेमोसमी पाऊस पडला होता. वादळ-वाऱ्यासह गारपीट झाल्याने १६ पकी ५ तालुक्यांतल्या शेतीला त्याचा मोठा फटका बसला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या ५७ गावांमधील शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. गारपिटीनंतर जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्वच तालुक्यातल्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. तब्बल ४ हजार ५६० हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नांदेडसह अर्धापूर, लोहा, हदगाव व मुदखेड या पाच तालुक्यांत बेमोसमी पावसाने थमान घातले होते. अन्य तालुक्यांत बेमोसमी पावसाने हजेरी लावली असली तरी त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. हदगाव तालुक्यातल्या १३०० हेक्टरवरील पिकांचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवारी झालेल्या पावसानंतर बुधवारी काही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कोठेही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2014 1:05 am

Web Title: farm damage to cold
टॅग Cold,Damage,Nanded
Next Stories
1 मराठी शुध्दलेखन तपासणीसाठी संगणकप्रणाली
2 रस्ते खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष
3 ‘टीएचआर’ योजनेचे तीनतेरा
Just Now!
X