News Flash

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

खोब्राजी टिंबे यांनी एसबीआय तामसा येथील बँकेचे कर्ज घेतले होते.

(संग्रहित छायाचित्र)

सततची नापिकी, डोक्यावर झालेले कर्जाचे ओझे कसे फेडावे या विंवचनेत असलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हदगाव तालुक्यातील लोहा येथे घडली.  खोब्राजी लिंबाजी टिंबे (वय ३०) असे त्यांचे नाव आहे. खोब्राजी टिंबे यांनी एसबीआय तामसा येथील बँकेचे कर्ज घेतले होते. घेतलेले कर्ज कसे फेडावे या काळजीने त्रस्त होते. गुरुवारी खोब्राजी टिंबे हे शेताला चाललो असे सांगून घरातून गेले व आपल्या शेजारी असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. या प्रकरणी तामसा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोद केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 2:04 am

Web Title: farmer commits suicide by strangulation
Next Stories
1 पैसे न दिल्याने वडिलांना मुलाकडून मारहाण
2 वृध्द सुरक्षा रक्षकाकडून चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
3 दारूसाठी पैसे न दिल्याने सांगोल्यात प्राणघातक हल्ला
Just Now!
X