27 January 2021

News Flash

दुष्काळाचा पहिला बळी, स्वत:ची चिता रचून शेतकऱ्याची आत्महत्या

नांदेडमधील घटना

प्रातिनिधिक छायाचित्र

गेल्या चार वर्षापासून सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती, कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या उमरी तालुक्यातील तुराटी या गावातील एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चित्ता (सरण) रचून  स्वतः पेटवून घेऊन आपली जीवन यात्रा संपवली ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास  घडली  या घटनेमुळे ऐन दिवाळीत गावात शोककळा पसरली आहे असून अंधारमय वातावरण निर्माण झाले होते.
उमरी तालुक्यातील तुराटी या गावातील पोतन्‍ना राजन्ना बलपीलवाड( वय साठ वर्ष) या शेतकऱ्याने आपल्या शेतात जाऊन एका झाडाखाली लाकडाचे (सरण) चित्ता तयार केली व त्यावर बसून त्याने स्वतःला पेटवून घेतले त्यात 100% जळाला असून त्या  शेतकऱ्याचा अक्षरशा कोळसा झाला आहे या घटनेवरून तुराटी गावात ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे.

घटनेने गावात कोणाच्याही घरात चूल  पेटली नव्हती  हे गाव तेलंगणा राज्याच्या सीमेवर अतिशय दुर्गम भागात आहे गेल्या अनेक वर्षापासून या गावाचा कसल्याच प्रकारचा विकास  झालेला नाही यामुळे खरीप  पिकावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याला सततची नापिकी सतावत आहे
आत्महत्या केलेल्या पोतन्‍ना या शेतकऱ्याकडे भारतीय स्टेट बँकेचे अडीच लाख, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 40  हजार  आणि सेवा सहकारी सोसायटीचे 40 हजार असे एकूण तीन लाख 20 हजार  एवढे कर्ज होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2018 7:55 pm

Web Title: farmer suicide by placing himself into a scam nended incident
Next Stories
1 उद्योजकाच्या पत्नीकडे २५ कोटींची खंडणी मागणार्‍याला ठोकल्या बेड्या
2 जायकवाडीत पाणी येण्याचा वेग मंदावला
3 प्रतिष्ठित घरची मुले नशेच्या गोळ्यांच्या आहारी
Just Now!
X