सात दिवसांपासून मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत

अकोला : नापिकी आणि कर्जबारीपणाला कंटाळून ६२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जिल्हय़ातील पिंपरडोळी येथे १९ नोव्हेंबरला उघडकीस आली. सात दिवसांपासून शेतकऱ्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुळशीराम नामदेव शिंदे, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
children stealing mobile phones nagpur
नागपूर : लहान मुले मोबाईल चोरी करायचे अन म्होरक्याला नेऊन द्यायचे…
people, blocked Chinchoti Kaman Bhiwandi road, protest
चिंचोटी कामण-भिवंडी रस्त्याची दुरावस्था, नागरिकांचे दोन तास रास्ता रोको 
Benefits of cuddling for health
हृदयाच्या आरोग्यापासून ते उत्तम झोपेपर्यंत ‘Cuddling’, ‘मिठी मारणे’ ठरते फायदेशीर! काय सांगतात डॉक्टर पाहा…

पातूर तालुक्यातील पिंपळडोळी येथील तुळशीराम नामदेव शिंदे यांच्याकडे चार एकर शेतात सोयाबीनचे पीक होते. सततच्या पावसामुळे त्यांना सोयाबीन सोंगता आले नाही. त्यामुळे पेरणीचा खर्चही निघाला नाही. आर्थिक अडचण निर्माण होऊन कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यातच डोक्यावर बँकेचे कर्ज. कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. तुळशीराम शिंदे १३ नोव्हेंबरला कुणालाही न सांगता घरून निघून गेले होते. पोलिसात १४ नोव्हेंबरला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. १९ नोव्हेंबरला वनपरिक्षेत्र आलेगाव अंतर्गत येत असलेल्या नवेगाव वनविभागाच्या जंगलामध्ये निंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सात दिवसांपासून झाडाला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात पाठवला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे.