29 September 2020

News Flash

जळगावमध्ये कर्जबाजीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

रेल्वे ट्रॅकवर जीवनयात्रा संपवली.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून पाचोरा तालुक्यातील खाजोळा येथील ८५ वर्षीय शेतकर्‍याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी  घडली. हिमंत दगा पाटील असे या मयत शेतकर्‍याचे नाव आहे.

गेल्या दोन वर्षांपासून नियमित दुष्काळी परिस्थिती, सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून हिंमत पाटील (रा.पाचोरा, जळगाव) या शेतकऱ्याने गोंडगाव रेल्वे गेटजवळ सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीसमोर स्वत:ला झोकून देत जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात २ मुली, १ मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. याआत्महत्येच्या घटनेनंतर पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून येथील ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 12:25 pm

Web Title: farmer suicides in jalgaon
Next Stories
1 विदर्भात महामार्गाच्या कामाची कूर्मगती!
2 केंद्र सरकारच्या निर्णयाचा साखर कारखानदारांना फटका
3 वाहन नोंदणीचे काम वितरकांकडे देण्याचा घाट
Just Now!
X