शासनाच्या ‘प्रेरणा’ची मात्राही लागू पडेना

सातत्याने पडणारा दुष्काळ, नापिकीमुळे शेतकऱ्यांमध्ये आलेले नराश्य दूर करून त्यांचे मनोधर्य वाढवण्यासाठी शासनाने कर्जमाफी जाहीर केली. सरकारच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी योजनेमुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला असला तरी प्रत्यक्षात मात्र बळीराजा आजही तणावाखाली असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्य शासनाच्या ‘प्रेरणा’ प्रकल्पांतर्गत झालेल्या निरीक्षणातून मागील सहा महिन्यांत ३ हजार २८ शेतकरी तणावग्रस्त असल्याचे समोर आले आहे.

बीड जिल्ह्यत सातत्याने निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती आणि नापिकीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आíथक ओढाताण आणि कुटुंबाची जबाबदारी अशा दुहेरी संकटात सापडलेला शेतकरी मृत्यूला कवटाळू लागल्याने आत्महत्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

राज्य शासनाने बहुप्रतीक्षित कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात मात्र किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला, हा संशोधनाचा विषय आहे. नराश्य आणि आíथक गत्रेतून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीची योजना प्रभावी ठरली नसल्याचे प्रेरणा प्रकल्पांतर्गत झालेल्या निरीक्षणातून समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे व त्यांच्या कुटुंबाला भक्कम आधार देत त्यांचे मनोधर्य उंचावण्यासाठी जिल्हा रुग्णालयांतर्गत शासनाचा प्रेरणा प्रकल्प राबवला जात आहे. तालुका किंवा गावपातळीवरील आशा स्वयंसेविकांमार्फत कर्जबाजारी आणि नराश्यात असलेल्या शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन केले जाते.

मागील सहा महिन्यांत ३ हजार २८ शेतकरी तणावग्रस्त आढळून आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांची स्थिती सुधारत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य विभागाची संकल्पना असलेल्या या योजनेत महसूलसह इतरही विभाग सहभागी आहेत.

सात हजार जणांचे समुपदेशन

जिल्हा रुग्णालयात या प्रकल्पांतर्गत शेतकरी मित्र कक्ष स्थापन करण्यात आला असून तणावग्रस्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी १०४ टोल फ्री क्रमांकावर बोलण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ, परिचारिका, अंगणवाडी सेविका यांचे पथक असून पंधरा दिवसाला जिल्हाभर दौरे करून शेतकऱ्यांचे समुपदेशन करतात. शेतकरी कुटुंबांमध्ये असलेल्या समस्येनुसार त्यांना उपचार उपलब्ध करून दिले जातात. मार्च २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत जिल्ह्यत ७ हजार २३२ शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले असून, साडेतीन लाख शेतकरी कुटुंबाचे निरीक्षण करण्यात आले आहे.