नुकसानीचे पंचनामे त्वरीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी

हरसूल : अवकाळी पाऊस, करोनासारखी महामारी आणि आता वादळी पावसामुळे नाशिक जिल्ह्य़ातील पेठ, सुरगाणा, हरसूल या आदिवासी भागाची अधिक हानी झाली असून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यातच वातावरणात अचानक होणारा बदल भर टाकत असल्याने शेतकरीवर्ग मेटाकु टीला आला आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून के ली जात आहे.

दोन वर्षांपासून नाशिक जिल्ह्य़ातील पेठ, सुरगाणा, हरसूल तसेच त्र्यंबके श्वर या आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे हाल सुरु आहेत. पीक चांगले येण्याची आशा निर्माण झाली असतांना अवकाळी पावसाने त्यांना निराश करण्याचे काम काही वेळा के ले आहे. त्यातच करोना महामारीमुळे कामाच्या शोधात इतरत्र जाण्याचे त्यांचे मार्गही बंद झाले. अशा परिस्थितीत फळबागा काही प्रमाणात हात देतील, अशी त्यांना आशा असतांना नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने त्या आशेवरही पाणी फिरविण्याचे काम के ले.

या आदिवासी भागात मोठय़ा प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी आहेत. यंदा आंब्यांनी चांगली फलधारणा के ल्याने शेतकऱ्यांची अपेक्षा वाढली होती. परंतु, वादळी पावसाने हरसूल परिसरातील शिरसगाव, गडदवणे, खरवळ,आडगाव (देवळा ), हरसूल पाली, खरशेत, खैरायपाली, जातेगाव, चिंचवड, भूतमोखाडा आदी गावातील आंबा फळांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान के ले. वादळामुळे कै ऱ्या गळून पडल्याने झाडांखाली जणूकाही कै ऱ्यांचा सडा पडला.

कै ऱ्या काढणीवर आल्याने काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांबरोबर बोलणी करुन व्यवहारही ठरविला होता. परंतु, वादळी पावसाने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया गेला. आता काही प्रमाणात ठेचलेल्या कै ऱ्यांचे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. या कै ऱ्या पिकण्याची शक्यता असली तरी बदलत्या वातावरणामुळे कै ऱ्या लवकर पिकण्याची शक्यता नसते. अशा ठेचाळलेल्या कै ऱ्या पिकण्यासाठी जितके  जास्त दिवस लागतील, तितके  नुकसानीचे प्रमाणही अधिक राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागणार आहे.

आंबा बागांशिवाय कोणे (ता.त्र्यंबकेश्वर) येथील किरण उदार या शेतकऱ्याचा दोन एकरचा कारल्याचा मंडप पूर्णपणे मोडकळीस आला. याशिवाय भोपळे, गिलक्याचे मंडपही कोसळले.भाजीपाला पिकांचे नुकसान किती प्रमाणात झाले त्याचा अंदाज लावणे कठीण आहे. अजूनही जोरात वारे वाहत असल्याने नुकसान अजून थांबलेले नाही. परिस्थिती धोक्याची असल्याने सर्वांनी काळजी घ्यावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे.