26 February 2021

News Flash

देशभरातील बळीराजा आजपासून १० दिवस संपावर

शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला एक वर्ष पूर्ण होत असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघालेला नाही. या प्रश्नांसाठी एक जूनपासून राज्यासह देशभरात शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

( प्रतिकात्मक छायाचित्र )

संपूर्ण कर्जमाफी, वीजबिल माफी, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी देशासह राज्यातील बळीराजा आजपासून संपावर जाणार आहे. आजपासून १० दिवस शेतकरी संपावर जाणार असून या कालावधीत दुधासह अन्य शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये आणला जाणार नाही.

शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला एक वर्ष पूर्ण होत असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघालेला नाही. या प्रश्नांसाठी एक जूनपासून राज्यासह देशभरात शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राज्यातील बळीराजा आजपासून संपावर जाणार असून शुक्रवारी सकाळपासून शेतमाल मुंबई, पुणे या शहरांकडे पाठवणे बंद करण्यात आले आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्यात दुध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. hg

राष्ट्रीय किसान महासंघाच्यावतीने १ ते १० जून दरम्यान देशव्यापी संपाची हाक देण्यात आली असून देशभरातील सुमारे १२० शेतकरी संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?
५० टक्के हमीभाव अधिक १० टक्के व्यवस्थापन खर्चासह भाव जाहीर करावा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपासाठी मोफत वीज, बैलगाडी शर्यतीस मान्यता, दुधाला प्रतीलिटर ५० रुपये भाव, शेतमाल प्रक्रिया उद्योगात इथॅनॉलसाठी प्राधान्य अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे. या संपात मंत्री व राजकीय नेत्यांना गावबंदी असेल, असा निर्णय मे महिन्यात वर्धा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता.

भाजीपाला व दूध गरजूंना द्या
संपाच्या कालावधीत शेतकऱ्यांनी दूध, भाजीपाला आणि धान्य शहर व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस आणू नये. हा भाजीपाला किंवा दूध रस्त्यावर फेकण्याऐवजी ग्रामीण भागातील गरजूंना द्यावा, असे आवाहन किसान क्रांती जन आंदोलन या शेतकरी संघटनेने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 10:19 am

Web Title: farmers nationwide 10 days strike began from friday vegetable prices may rise
Next Stories
1 जीना नहीं, गन्ना.
2 विरोधकांच्या एकीत भाजप पराभूत
3 गौरी लंकेश हत्याप्रकरणी आरोपपत्र दाखल
Just Now!
X