News Flash

पीकविम्याच्या बीड प्रारुपास शेतकऱ्यांचाच विरोध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे सादर करण्यात आलेल्या पीक विम्याच्या ‘बीड पारुपा’ला शेतकऱ्यांकडूनच विरोध होऊ लागला आहे.

विमा कंपनी आणि सरकार विरोधात आंदोलन

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे सादर करण्यात आलेल्या पीक विम्याच्या ‘बीड पारुपा’ला शेतकऱ्यांकडूनच विरोध होऊ लागला आहे. या प्रारुपामुळेच जिल्ह्यला पीक विमा मिळाला नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात गेवराई तलवाडा येथे विमा कंपनी आणि राज्य सरकारच्या विरोधात शनिवारी आंदोलन केले.

बीड जिल्ह्यतील तलवाडा (ता. गेवराई) येथे शनिवार, दि. १९ जून रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बोंबमारो आंदोलन केले. खरीप हंगाम २०२०—२१ मध्ये १७ लाख ९१ हजार ५२२ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. यामध्ये शेतकरी, राज्य आणि केंद्राने मिळून जवळपास ७९८ कोटी ५८ लाख रुपये भरणा केला होता. त्यापैकी केवळ १९ हजार ३४४ शेतकऱ्यांना १२ कोटी १९ लाख रुपये भरपाई पोटी मिळणार आहेत. मग यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा आहे की विमा कंपनीचा असा प्रश्न पूजा मोरे यांनी उपस्थित केला. खरीप हंगामातील पिके जोमात होती. मात्र, अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. शासनाच्या वतीने झालेल्या पंचनाम्यात जवळपास ४ लाख ३२ हजार ७०३ शेतकऱ्यांची पिके बाधित असल्याचा अहवाल कृषी विभागाने राज्याला पाठवला. त्यामुळे पीक विमा कंपनीनेही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. पीक विमा कंपन्या आणि राज्य सरकारची मिलीभगत असल्याने कंपन्यांना आता शेतकऱ्यांना लुटण्याचा शासनमान्य परवाना मिळाल्याचा आरोप मोरे यांनी केला. प्रशासनाने केलेल्या नुकसानीचे पंचनामे ग्रा धरून त्यानुसार सरसकट शेतकऱ्यांना विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. गेवराईचे तहसीलदार, कृषी अधिकारी आणि विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.

अन्यथा शेतकऱ्यांसह धडक

बीड जिल्ह्यतील शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी नुकसान भरपाई मिळालेली नाही. पंतप्रधानांपुढे सादर केलेला पीक विम्याचे बीड पारुप फसवे आणि शेतक ऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवणारे आहे. कृषी व महसूलचे पंचनामे ग्रा धरून शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा द्यावा. अन्यथा पावसाळी अधिवेशनावर शेतकऱ्यासह धडक मारू असा इशारा पूजा मोरे यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 12:30 am

Web Title: farmers oppose crop insurance scheme ssh 93
Next Stories
1 विनोद शिवकुमार याचा जामीन अर्ज फेटाळला
2 सारथी संस्थेला स्वायतत्ता!, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार संभाजीराजे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर घोषणा
3 Maharashtra Covid-19 Update: राज्यातल्या नवबाधितांच्या संख्येत घट, बरे होणाऱ्यांची संख्या वाढली!
Just Now!
X