21 September 2020

News Flash

पिकाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या काळजीमुळे ते उदास होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

 

अतिवृष्टीमुळे पीक वाया गेल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत असलेल्या तालुक्यातील नेर येथील महेश प्रकाश जयस्वाल (३९) या शेतकऱ्याने घरात गळफास घेतला.

जयस्वाल यांनी गळफास घेतल्याचे त्यांच्या पत्नीला दिसल्यानंतर त्यांनी आरडा ओरड केली. गावातच राहणारे चुलत भाऊ  प्रविण जयस्वाल आणि इतरांनी महेश जयस्वाल यांचा देह खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. महेश यांनी आपल्या शेतात कापूस आणि बाजरीचे पीक लावले होते. मात्र अधिक पावसामुळे पीक वाया गेले. घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या काळजीमुळे ते उदास होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 12:58 am

Web Title: farmers suicide due to crop damage abn 97
Next Stories
1 घरात सापडलेल्या एका चिठ्ठीने पूर्वायुष्य पतीचे उलगडले
2 पालघरमधील सर्वच रस्ते कोंडीग्रस्त
3 परराज्यातून आलेला ३२ लाखांचा मद्यसाठा जप्त
Just Now!
X