06 July 2020

News Flash

मळणी मशिनमध्ये पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

हरबरा पिकाची काढणी चालू असताना तोल जाऊन मळणी मशिनमध्ये पडल्याने माळेवाडी येथील गोकुळ राजधर औताडे (वय ५०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

| March 10, 2015 03:00 am

हरबरा पिकाची काढणी चालू असताना तोल जाऊन मळणी मशिनमध्ये पडल्याने माळेवाडी येथील गोकुळ राजधर औताडे (वय ५०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हवामान खात्याने गारपीट होण्याची शक्यता वर्तविल्याने शेतकऱ्यांची पिके काढण्याची धांदल सुरू आहे. औताडे हे मळणी मशिनमध्ये हरबरा पीक टाकत असताना अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष भास्कर औताडे यांचे ते बंधू होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2015 3:00 am

Web Title: farmers unfortunate death fall in the threshing machine
टॅग Farmers,Shrirampur
Next Stories
1 तुळजापूरमध्ये गारपिटीने शेतकरी पुन्हा उद्ध्वस्त
2 गरीब मुलींच्या शिक्षणासाठी अधिकारी उभाणार एक कोटी
3 मराठवाडय़ातील १८ कारखान्यांकडे ऊस खरेदीकराचे ११४ कोटी बाकी
Just Now!
X