मार्चअखेर २५८ शेततळ्यांचे काम पूर्ण

राज्यातील पर्जन्यमानावर आधारीत कोरडवाहू शेतीची पाणलोट व जलसंधारण माध्यमातून उपलब्धता वाढविण्यासाठी माहाराष्ट्र शासनाने यापूर्वी विविध योजनांच्या मध्यमातून अनुदान पध्दतीने शेततळे ही योजना राबवली होती. आता शासन  मागेल त्याला शेततळेह्ण ही वैयक्तीक लाभाची योजना राबवण्यात येत आहे. या योजनेला रायगड जिल्ह्यातील शेतकरयांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. मार्च अखेर २५८ शेततळी पुर्ण झाली असून जून अखेर पर्यंत ४०० शेततळी पुर्ण करण्याचे उद्दीष्ट कृषी विभागाने ठेवले आहे

रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी योजनेच्या धर्तीवर अनुदान पध्दतीने शेततळी बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हेअ  वगळता राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यारचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकर्या चे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.

सद्यस्थितीत राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहताव शेतकऱ्यांकडे स्वतची सिंचन व्यवस्था करण्यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत राज्यात ५१ हजार ५०० तळी बांधण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यात चालू वर्षांसाठी ४००तळ्यांचे लक्षांक  देण्यात आला होता. या योजनेला रायगड जिल्ह्यतून उदंड प्रतिसाद लाभला. जिल्ह्यतील १ हजार ३०५ शेतकऱ्यांनी या योजने अंतर्गत शेततळे बांधण्यासाठी अर्ज केले. यापकी ७०८ शेतकरी पात्र ठरले. यापकी पहिल्या टप्प्यात ५८१अर्जाना समितीने मंजुरी दिली असून मार्च अखेर यातील २५८ शेततळ्यांचे काम पुर्ण झाले आहे. उर्वरीत शेततळ्यांची काम जून अखेर पर्यंत पुर्ण होणे अपेक्षित आहे. लक्षांकाच्या दुप्पटीहून अधिक शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. हिबाब लक्षात घेऊन राज्यसरकारकडून जिल्ह्यसाठी दिलेला लक्षांक वाढवून मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यास राज्यसरकारने मंजुरी दिली होती.

काय आहेत फायदे

रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेतून  मत्स्यपालन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे ,  संरक्षित पाणी,  पाण्याचे पुनर्भरण यासाठी शेततळ्यांचा उपयोग होणार आहे.c