News Flash

महाड इमारत दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी फारूक काझीला पोलीस कोठडी

११ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश

संग्रहीत छायाचित्र

सोळा जणांचे बळी घेणाऱ्या महाड येथील तारिक गार्डन इमारत दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी फारूक काझी याची अखेर पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे .

फारूकला ११ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश महाडच्या प्रथमवर्ग न्यायालयाने दिले आहेत .दुर्घटनेपासून फरार असलेला फारूक गुरुवारी माणगाव सत्र न्यायालयासमोर शरण आला होता. न्यायालयाने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणातील सहा आरोपींपैकी तीन जणांना आतापर्यंत अटक झाली आहे .

ही दुर्घटना घडल्‍यापासून फारूक फरार होता. रायगड पोलिसांच्‍या तीन तुकडया त्‍याचा शोध घेत होत्‍या . दरम्‍यानच्‍या काळात अटकपूर्व जामीनासाठी त्‍याची धडपड सुरू होती.  त्‍याने दोन दिवसांपूर्वी माणगाव सत्र न्‍यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्जही केला होता. त्‍यावर काल सुनावणी होणार होती. परंतु त्‍यापूर्वीच तो न्‍यायालयासमोर हजर झाला होता. न्‍यायालयाने त्‍याला पोलीसांच्‍या ताब्‍यात दिले होते.

२४ ऑगस्ट रोजी तारिक गार्डन इमारत जमीन दोस्त झाली होती. या दुर्घटनेत १६ जणांना जीव गमवावा लागला होता. या प्रकरणात पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याचे आरोपी फारूक याचे वकील  विलास नाईक यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 5:49 pm

Web Title: farooq qazi the main accused in the mahad building accident case has been remanded in police custody msr 87
Next Stories
1 कोल्हापूर : कागल तालुक्यात दहा दिवसांसाठी जनता टाळेबंदीचा निर्णय
2 वसई विरारमध्ये ५ नव्या पोलीस ठाण्यांची निर्मिती
3 पालघर : शिक्षक महासंघ ‘शिक्षक दिन’ काळा दिवस म्हणून साजरा करणार!
Just Now!
X