News Flash

नर्मदा बचाव आंदोलन हा पाटकरांचा फार्स- दाभोळकर

नर्मदा बचाव आंदोलन हा केवळ प्रसिद्धीचा फार्स होता, अशी टीका ज्येष्ठ साहित्यिक दत्तप्रसाद दाभोळकर यांनी केली.

| January 13, 2015 01:30 am

नर्मदा बचाव आंदोलन हा केवळ प्रसिद्धीचा फार्स होता, अशी टीका ज्येष्ठ साहित्यिक दत्तप्रसाद दाभोळकर यांनी केली.
वेध प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘नर्मदा प्रकल्पाची शोधयात्रा’ या विषयावरील व्याख्यानात दाभोळकर बोलत होते. व्यासपीठावर डॉ. एम. एस. कुलकर्णी, अशोक गोस्वामी, भारत माळवदकर आदी उपस्थित होते. दाभोळकर म्हणाले, की नर्मदा प्रकल्पाचे काम सहा वष्रे बंद पाडून दरवर्षी देशाचे चार कोटींचे नुकसान या आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर यांनी केले. आपल्या मताशी ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू व निळू फुले हे सहमत असल्याचा दावाही त्यांनी केला. १९५९मध्ये सरदार पटेलांच्या हस्ते नर्मदा सरोवराची कोनशिला उभारण्यात आली होती. त्यानंतर या प्रकल्पासंदर्भात जाणीवपूर्वक गरसमज पसरवण्यात आले. १९८८ ते ९० दरम्यान जगातील १३ देशांत ५३ खासगी संस्था स्थापन करून प्रकल्पाला विरोध करण्यात आला. मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभारले गेले. विस्थापितांच्या पुनर्वसनासंबंधी आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. कारण धरणाच्या खर्चाच्या तुलनेत त्याचा खर्च केवळ ४ टक्के होता. असे असतानाही उच्च न्यायालयात जाऊन प्रसिद्धीसाठी अकारण त्यांनी वेळ घालवला. न्यायालयात पाटकरांच्या विरोधात निकाल गेला. त्याचबरोबर अकारण प्रकल्प रेंगाळला, असे दाभोळकर म्हणाले. व्याख्यानास मोठय़ा संख्येने लोक उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 1:30 am

Web Title: fars of narmada bachao andolan
टॅग : Latur
Next Stories
1 ऊसतोडणी कामगारांचे २० पासून काम बंद आंदोलन
2 डॉक्टर दाम्पत्याचे अपहण करून खंडणी मागणाऱ्या शिक्षकावर गुन्हा
3 डोंगरीतील वाळीत प्रकरणात समेट घडविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न
Just Now!
X