20 October 2020

News Flash

सोलापूर शहरात पुन्हा जलद चाचण्या सुरू

शुक्रवारी शहरात २२१६ चाचण्या घेण्यात आल्या असता त्यात ४५ बाधित रूग्ण सापडले.

संग्रहीत छायाचित्र

शहरात गेल्या महिन्यात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुन्हा दहा दिवसांची टाळेबंदी लादण्यात आली असतानाही त्या काळात करोनाची साखळी तोडण्यासाठी पुरेशा प्रमाणात जलद चाचण्या (अ‍ॅन्टिजेन टेस्ट) घेण्यात आल्या नव्हत्या. दुसरीकडे जिल्हा ग्रामीणमध्ये करोनाबाधित रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींसह ‘कोमॉर्बिड’ व्यक्तींसाठी जलद चाचण्यांचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. शहरातही आता पुन्हा मागणीनुसार जलद चाचण्यांची मोहीम राबविण्यात येत आहे.

शुक्रवारी शहरात २२१६ चाचण्या घेण्यात आल्या असता त्यात ४५ बाधित रूग्ण सापडले. तर दोन रूग्ण दगावले. जिल्हा ग्रामीणमध्ये २६२८ चाचण्या घेण्यात आल्या असता २८८ बाधित रूग्ण आढळून आले. तर तीन रूग्णांचा मृत्यू झाला. शहर व जिल्ह्यात मिळून एकाच दिवशी ३३३ बाधित रूग्ण सापडले. तर पाच रूग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या १२ हजार ७४९ इतकी झाली असून याशिवाय मृतांचा आकडा ५८४ वर गेला आहे. यात शहरातील रूग्णसंख्या ५६८९ असून मृत्यू ३८७ आहेत. जिल्हा ग्रामीणमधील रूग्णसंख्या ७०६० एवढी आहे. तर मृतांची संख्या १९७ झाली आहे. शहर व जिल्ह्यात मिळून आतापर्यंत एक लाख १३८४ संशयित रूग्णांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले असता त्यात बाधित रूग्णांचे प्रमाण १२.५७ टक्के इतके आहे. तथापि, शहरात आतापर्यंत ७७.४४ टक्के रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर मृत्यूचे प्रमाण मात्र अजूनही ६.८० टक्के आहे. चाचण्यांमधून बाधित रूग्ण सापडण्याचे प्रमाण १३ टक्के आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये करोनामुक्त होण्याचे प्रमाण शहरापेक्षा कमी,म्हणजे ५७.९८ टक्के इतके राहिले आहे. मात्र मृत्यूचे प्रमाण २.७९ टक्कय़ांवर मर्यादित राहिले आहे. एकूण चाचण्यांतून बाधित रूग्ण आढळून येण्याची टक्केवारी १२.२५ एवढी आहे.

पंढरपुरात १२६ रुग्ण

शुक्रवारी शहरात सापडलेल्या नवीन बाधित रूग्णांमध्ये सम्राट चौकाजवळील महेश कॉलनी या पांढरपेशी वसाहतीत ७ पुरूष व ४ महिला बाधित रूग्ण सापडले. जिल्हा ग्रामीणमध्ये पंढरपुरात दररोज बाधित रूग्णांचे शतक होत आहे. आज येथे १२६ रूग्ण सापडले. शिवाय एका डॉक्टरचा मृत्यू झाला. पंढरपूरची रूग्णसंख्या १५७७ झाली आहे. बार्शीत ४८ रूग्ण सापडले असून तेथील रूग्णसंख्या आता १३९४ वर पोहोचली असून मृतांचा आकडाही जिल्ह्यात सर्वात जास्त ६१ झाला आहे. माळशिरसमध्ये ३८ तर सांगोला येथे १७ नवे बाधित रूग्ण सापडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:08 am

Web Title: fast tests resume in solapur city abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 गोव्यातून पळवून आणलेल्या बाळाच्या आई-बाबांना पोलिसांनी घेतला शोध
2 एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी केंद्र बदलण्यास मुभा
3 कुलगुरू डॉ.विलास भाले यांचा मानद कर्नल कमांडंट पदाने सन्मान
Just Now!
X