23 September 2020

News Flash

पित्याकडून दोन मुलींची हत्या

तीन मुलींचे पालनपोषण करू शकत नाही म्हणून एका अल्पभूधारक शेतकऱ्याने दोन मुलींना विहिरीतील तीन फूट पाण्यात बुडवून ठार केल्याची हृदयद्रावक घटना नागभीड तालुक्यातील पारडी (ठवरे)

| April 23, 2015 01:26 am

तीन मुलींचे पालनपोषण करू शकत नाही म्हणून एका अल्पभूधारक शेतकऱ्याने दोन मुलींना विहिरीतील तीन फूट पाण्यात बुडवून ठार केल्याची हृदयद्रावक घटना नागभीड तालुक्यातील पारडी (ठवरे) येथे घडली. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी आरोपी तामदेव झरकर याला अटक केली आहे. भावना (११) व जागृती (९) ही मृत मुलींची नावे आहेत.तामदेव झरकर हा पत्नी व तीन मुलींसह पारडी (ठवरे) येथे राहात होता. त्याच्याकडे केवळ एक एकर शेती असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे मोलमजुरी करून तो कुटुंबाचे पालनपोषण करीत होता. मुलींचे शिक्षण, लग्न व पालनपोषण करू शकत नसल्याने चिंचित होता. त्यातून त्याने दोन मुलींना तीन फूट पाण्यात बुडवून निर्दयपणे ठार केले.
नागभीड पोलिस ठाण्यात मृत मुलींची आई अल्का तामदेव झरकर यांनी २० एप्रिल रोजी मुली बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 1:26 am

Web Title: father killed two daughters in chandrapur
Next Stories
1 ‘आरटीओं’च्या खुर्चीला बेशरमाच्या फुलांचा हार!
2 औरंगाबादेत ६२ टक्के मतदान
3 औरंगाबादमध्ये एमआयएमची लक्षवेधक मुसंडी
Just Now!
X