आपल्यापैकी अनेकांनी आजपर्यंत आनंदाच्या क्षणी डीजे लावून नाचणाऱ्या मिरवणुका पाहिल्या असतील. मात्र शनिवारी नागपूरमध्ये डीजे लावून चक्क एत अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेमध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजत होता मात्र लोकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते, लोक एकमेकांना धीर देत होते. ही अंत्ययात्रा होती महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत या अवघ्या वयाच्या २२ व्या वर्षी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या खेळाडूची.

शुक्रवारी अकोला येथील शास्त्री स्टेडियम जवळ असलेल्या ‘क्रीडा प्रबोधनी’मध्ये प्रणवने गळफास लावून आत्महत्या केली. नुकत्याच दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. त्यामुळे त्याच्या आत्महत्येबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र प्रणवच्या आत्महत्येबरोबरच त्याच्या अंत्ययात्रेचीही सध्या अकोल्यात चांगलीच चर्चा आहे. कारण २२ वर्षाच्या मुलाच्या अंत्ययात्रेत चक्क डीजे लावण्यात आला होता.

82 year old CSK fan's tribute post for MS Dhoni wins internet
“मी धोनीसाठी आले आहे!”, ८२ वर्षीय आजीची सर्वत्र हवा! Viral Video एकदा बघाच
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
34 Year Old Marries 80 Year Old Reel Star
८० वर्षांच्या रीलस्टारच्या प्रेमात महाराष्ट्रातील ३४ वर्षीय शीला झाली ‘दिवानी’; लग्नासाठी पार केले ६०० किमी अन् आता..
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

कोण आहे प्रणव?

प्रणव राऊत याच्याकडे महाराष्ट्रातील बॉक्सिंगच्या श्रेत्रातील उद्योन्मुख खेळाडू म्हणून पाहिले जात होते. ११ व्या इयत्तेत शिकणाऱ्या प्रणवने दिल्लीमध्ये जानेवारी महिन्यात राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धात चमकदार कामगिरी केली होती. त्या स्पर्धांमध्ये प्रणवने सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर त्याची फारशी चर्चा झाली नव्हतो मात्र शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास प्रणवने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. तो शास्त्री स्टेडियममधील रुम मधून बाहेर आला नाही, म्हणून त्याच्या मित्रांनी दरवाजा ठोठावला. दरवाजा आतून बंद होता. खूप वेळा दरवाजा वाजवूनही दरवाजा उघडला नसल्याने अखेर त्याच्या मित्रांनी दरवाजा तोडला. त्यावेळी प्रणवने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. प्रणवने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याने राऊत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मित्र म्हणतात…

“प्रणवच्या वागण्यात कालपर्यंत काहीही वेगळेपणा जाणवत नव्हता”, असे त्याच्या मित्रांकडून समजले. “प्रणवच्या वागण्यातून किंवा बोलण्यातून तो कोणत्याही तणावात किंवा दबावात असल्याचे वाटले नाही”, असे त्याच्या प्रशिक्षकांनीही सांगितले. वयाच्या २२ व्या वर्षी प्रणवने आत्महत्या केल्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

तो पराभव जिव्हारी लागला?

एकीकडे सर्वांना प्रणवच्या आत्महत्येने धक्का बसलेला असतानाच त्याच्या अंत्ययात्रेला चक्क डीजे वाजवण्यात आला. प्रणव याचे वडील राष्ट्रपाल हे नागपूर शहर पोलिसांच्या गणेशपेठ ठाण्यामध्ये हवालदार म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रपाल यांनाही बॉक्सिंगची प्रचंड आवड आहे. त्यामुळेच त्यांनी मुलाला बॉक्सिंग खेळण्याची प्रेरणा दिली होती. मात्र रोहतकमध्ये २८ जानेवारी रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीमध्ये प्रणव पराभूत झाल्याने तो निराश झाला होता. याच नैराश्येतून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

…म्हणून लावला डीजे

आंतरराष्ट्रीय निवड चाचणीसाठी झालेल्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे नैराश्येतून प्रणवने आत्महत्या केल्याने त्याच्या वडीलांना धक्का बसला आहे. प्रणवने लिहिलेल्या आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये, “बाबा मला माफ करा, मी तुमचे स्वप्न पूर्ण केलं नाही,” असं लिहिलं होतं. आपली अंत्ययात्रा डीजेच्या तालावर निघावी अशी इच्छा प्रणवने वडिलांकडे बोलू दाखवली होती. त्यामुळेच त्याच्या वडिलांना आपल्या तरुण मुलाच्या अंत्ययात्रेला डीजे लावून लाडक्या मुलाला अखेरचा निरोप दिला.