News Flash

मुलीच्या मैत्रिणीवर वडिलांचा अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना

३० वर्षीय नराधमाने आपल्याच मुलीच्या मैत्रिणीशी घरात कोणी नसताना अत्याचार केल्याची धक्कादायक घटना

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पिंपरी-चिंचवडमध्ये वडिलांनी स्वतःच्या मुलीच्या मैत्रिणीवरच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात कोणी नसताना ३० वर्षीय नराधमाने मुलीवर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील नराधम आरोपीने दिली होती. ही घटना सोमवारी पीडित मुलीच्या घरात घडली आहे. पिंपरी पोलिसांमध्ये पीडित मुलीच्या आईने तक्रार नोंदवल्यानंतर याप्रकरणी ३० वर्षीय नराधमाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय नराधमाने आपल्याच आठ वर्षीय मुलीच्या मैत्रिणीशी घरात कोणी नसताना अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नराधमाला पिंपरी पोलिसांनी अटक केली असून पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने पिंपरी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. सोमवारी पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात कोणी नव्हते. त्यावेळी ३० वर्षीय नराधम घरात गेला आणि जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. ही बाब पीडितेने तिच्या आईला सांगितली, त्यानंतर पिंपरी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. पीडित मुलीचे आई-वडील हे मोलमजुरी करून पोट भरतात. या घटनेमुळे पुन्हा एकदा जवळच्याच व्यक्ती मुलींना वासनेचा शिकार बनवत असल्याचं निदर्शनास आले आहे. या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रत्नमाला सावंत या करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 1:35 pm

Web Title: father rapes on daughters friend minor girl shocking incident of pune
Next Stories
1 म्हाडाकडून राज्यभरात तीन हजार घरांसाठी सोडत
2 बोगस ठरवण्याची प्रक्रियाच सदोष
3 पीएमआरडीएचा विकास आराखडा सिंगापूर शासन करणार
Just Now!
X