News Flash

पिता-पुत्र डॉक्टरांचा करोनामुळे मृत्यू

मुलावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

कल्याण : कल्याणमधील पिता-पुत्र असलेल्या दोन डॉक्टरांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. डॉ. नागेंद्र भूषण मिश्रा (५५), डॉ. सूरज नागेंद्र मिश्रा (२८) अशी निधन झालेल्या डॉक्टर पिता-पुत्रांची नावे आहेत. डॉ. नागेंद्र यांच्यावर ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉ. नागेंद्र हे खडवली येथे, मुलगा डॉ. सूरज हे बापगाव येथे दवाखाना चालवित होते. करोना काळात ते गेल्या वर्षीपासून समर्पित भावनेने रुग्ण सेवा देत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. डॉ. सूरज यांचा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विवाह झाला होता. कल्याणमधील काही सामाजिक संस्थांशी डॉ. नागेंद्र यांचा संबंध होता. दोन्ही डॉक्टरांच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 1:05 am

Web Title: father son doctor dies of corona virus infection akp 94
Next Stories
1 करोनामुक्त सात कैद्यांची जबाबदारी घेण्यास कोणीच तयार नसल्याने खाटा अडल्या
2 स्थिती पाहून निर्बंध कालावधी वाढवणार – टोपे
3 २१ वर्षांत ६६६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
Just Now!
X