News Flash

पाचव्या मजल्यावरून मुलगी अंगावर पडल्याने वडिलांचा मृत्यू

नाशिकमधील हृदयद्रावक घटना

नाशिकमधील हृदयद्रावक घटना

लग्नातील हळदीचा समारंभ इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पाहणारी मुलगी तोल गेल्याने कोसळून खाली  वडिलांच्या अंगावर पडली. या दुर्देवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला, तर मुलगी गंभीर जखमी आहे. एकलहरा परिसरातील जयप्रकाश नगर येथे गुरूवारी रात्री हा प्रकार घडला.

सामनगाव रस्त्यावरील जयप्रकाश नगरातील अश्विन कॉलनी परिसरात महानगरपालिकेची आवास योजना आहे. या ठिकाणी विजय गोधडे हे कुटूंबियासमवेत हळदीच्या कार्यक्रमासाठी आले होते. गुरूवारी रात्री उशीरापर्यंत कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाची गंमत पाहण्यासाठी त्यांची मुलगी सुनंदा ही इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गेली. अंधार असल्याने तिला कार्यक्रम पाहता येत नव्हता. तो पाहण्यासाठी ती इमारतीच्या कठडय़ावर बसली. त्यातच तोल गेल्याने ती पाचव्या मजल्यावरून खाली कोसळली. सुनंदा नेमकी वडिलांच्या अंगावर पडली. त्यामुळे गोधडे जवळच्या सिमेंट, काँक्रिटच्या बांधकामावर आदळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागला. सुनंदाही जखमी झाले. दोघांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू होण्यापूर्वीच गोधडे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमी सुनंदावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद नाशिकरोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गोधडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुलगे असा परिवार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2018 12:43 am

Web Title: fathers death due to daughter in nashik
Next Stories
1 दुहेरी हत्याकांडात आरोपीला फाशी
2 प्रादेशिक वस्तुसंग्रहालय पुन्हा सरकारवाडय़ात येणार
3 अंतर्गत वादाचा अपप्रचार
Just Now!
X