08 March 2021

News Flash

औरंगाबादमध्ये बेपत्ता विधवा महिलेची हत्या

डोक्यात दगड घालून खून झाल्याचे प्रथमदर्शनी आढळल्याचे पोलिसांनी म्हटले आहे

औरंगाबादमधील पुंडलिकनगर येथून गेल्या २६ जानेवारी रोजी बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत देवळाई शिवारात मंगळवारी दुपारी ४.३० अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला. गोदावरी गणेश खालसे (३३) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पतीचे २०१२ मधे निधन झाले आहे. गोदावरी यांना दोन मुले असून एक ४ व एक ८ वी इयत्ते मध्ये शिकतो.

देवळाईतील साईटेकडी जवळील तलाव परिसरात गोदावरी यांचा मृतदेह आढळला. डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे. मृतदेह हाती लागला तेव्हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. चिकलठाणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 9:47 pm

Web Title: females dead body recovered in aurnagbad police case registered
Next Stories
1 युती झाली तरीही दानवेंविरोधत लढणार, खोतकरांचा यल्गार
2 …तर धनंजयसाठी राजकारणही सोडलं असतं-पंकजा मुंडे
3 केंद्राकडून भरघोस मदत मिळवण्यात मुख्यमंत्री अपयशी – मुंडे
Just Now!
X