आलिशान कारमध्ये गर्भिलग चाचणी करण्यासाठी वापरलेली यंत्रसामग्री सांगलीतून खरेदी केल्याचे पोलीस तपासात पुढे आले असून, कोल्हापूर पोलिसांचे एक पथक सांगलीला रवाना झाले आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या िहदुराव पोवार यांची बीएएमएसची पदवीच खोटी असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
आलिशान कारमध्ये अवैध गर्भिलग चाचणी करण्याच्या उद्देशाने संशयीतरीत्या फिरत असलेली मोबाइल व्हॅन जुना राजवाडा पोलिसांनी गुरुवारी हस्तगत केली होती. याप्रकरणी डॉ. िहदुराव बाळासो पोवार (वय ३०, रा. शिरगाव, ता. राधानगरी), डॉ. हर्षल रवींद्र नाईक (वय ३१, रा. बोंद्रेनगर, कोल्हापूर) व चालक सुशांत मारुती दळवी (वय २६, रा. कांचनवाडी, ता. करवीर) यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून कार, गर्भिलग निदान करणारी यंत्रणा असा ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
गर्भिलग चाचणी करण्यासाठी आणलेली मशिन कोठून मिळवली याचा पोलीस तपास घेत होती. यामध्ये ही मशिन सांगलीतून प्राप्त केली असल्याचे तपासात पुढे आले. याप्रकरणी संशयितास ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक सांगलीकडे रवाना झाले आहे.
िहदुराव पोवार याचे बारावीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्याने कोल्हापुरातील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. मात्र वैद्यकीय शिक्षणासाठी त्याचा कोठे प्रवेश नव्हता. यानंतर त्याने बिद्रीतील एक रुग्णालयात कम्पाउंडर म्हणून काम केले. या ठिकाणी गर्भिलग चाचणी कशा पद्धतीने केली जाते हे त्याने पाहिले होते. यावरून त्याला गाडीतून गर्भिलग चाचणीची कल्पना सुचली, अशी माहिती देण्यात आली आहे.