शाहू पॅटर्न नावाने राज्यभर गाजलेल्या राजर्षी शाहू महाविद्यालयाची लातूर-नांदेड रस्त्यावरील चारमजली इमारत, मुलांचे वसतिगृह हे सुमारे १४ हजार चौरस मीटरचे बांधकाम विनापरवाना करण्यात आले असल्याचे माहिती अधिकार कायद्याच्या साह्याने उघडकीस आणणारे माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांच्यावर शुक्रवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. भाईकट्टी यांना महाविद्यालयाच्या परिसरात आणून अत्यंत घृणास्पद पद्धतीने त्यांना काळे फासण्यात आले आणि सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यांसमोर त्यांना लोखडी सळईच्या साह्याने जोरदार मारहाण करण्यात आली. यामध्ये भाईकट्टी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लातूरमधील शिवसेनेचे नेते अभय साळुंके यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, नामवंत महाविद्यालयाची बदनामी केली म्हणून आम्हीच हा हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे लातूरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लातूर-नांदेड रस्त्यावरील चारमजली इमारतीचे बांधकाम बेकायदा असल्याचे उघडकीस आल्यावर ती इमारत पाडण्याची नोटीस महापालिकेने महाविद्यालयाला दिली. यासंदर्भात गुरुवारीच पत्रकार परिषद घेऊन भाईकट्टी यांनी याबद्दल माहिती दिली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने हा हल्ला केला. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाईकट्टी यांना त्यांच्या घरातूनच मारहाण करीत महाविद्यालयामध्ये आणले. तिथे जमलेलेल्या हजारो विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले आणि त्यांना लोखडी सळईने बेदम मारहाण करण्यास सुरुवात करण्यात आली. शहरातील एका नामवंत महाविद्यालयाची बदनामी का केली, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. भाईकट्टी यांचा मोबाईलही यावेळी बंद करण्यात आला होता.
भाईकट्टी हे ब्लॅकमेलर असल्याचा आरोप अभय साळुंके यांनी केला. महाविद्यालयाची बदनामी करण्यासाठीच त्यांनी इमारत बेकायदा असल्याचा आरोप केला, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, भाईकट्टी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Modi, religious polarization, Marathwada,
‘रजाकारी’ला उजाळा देत मराठवाड्यात मोदींचा धार्मिक ध्रुवीकरणावर भर
Sanjay Singh alleges that Arvind Kejriwal is not allowed to meet his family face to face
केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
thane shivai nagar samaj bhavan marathi news
शिवाईनगर येथील समाजभवनावरून शिवसेना -भाजपत जुंपली