सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा पाचवा बळी गेला आहे. कणकवली तालुक्यातील एका ६० वर्षीय पुरुषाचे करोनामुळे मंगळवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात निधन झाले आहे.दि. २० जून पासून ते उपचार घेत होते.

त्यांचा पहिला नमूना निगेटिव्ह आला होता. तर दूसरा नमूना पॉझिटिव्ह आला होता. गेले दहा दिवस ते व्हेन्टीलेटरवर होते. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यात करोनाचा पाचवा बळी ठरला आहे.

त्यामुळे जिल्ह्यात २१४ करोना बाधित व्यक्ती पैकी पाच व्यक्तींचे निधन झाले आहे. तर १५२ व्यक्ती करोनामुक्त झाले आहेत. एक रुग्ण मुंबई येथे गेला आहे. त्यामुळे ५६ रुग्ण सक्रीय राहिले आहेत, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.२ ते ८ जुलै या कालावधीत जिल्हाधिकारी यांनी पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले आहे.गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे

जिल्ह्यात कणकवली मध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरसकट जिल्ह्यात लॉकडाऊ न जाहीर करण्यात आले आहे. त्याबद्दल व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी जिल्ह्यात सरसकट लॉकडाऊ न करण्याचा जिल्हाधिकारी यांचा निर्णय चुकीचा आहे असे म्हटले आहे.