25 November 2020

News Flash

तारापूरचा अणुऊर्जा प्रकल्प पन्नाशीतही तरुण

देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाने आज ५० वर्षांचा टप्पा गाठला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नीरज राऊत

कालानुरूप बदल केल्याने ‘टॅप्स’ सक्षम, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव

बदलत्या परिस्थितीनुसार आपण बदलत राहिलो तर काळासोबत राहतो, असे म्हटले जाते. तारापूरचा अणुऊर्जा प्रकल्पही असाच काळाबरोबर बदलत राहिल्याने पन्नाशीतही तरुण आहे. अणुऊर्जा क्षेत्रातील बदल आणि सुरक्षिततेविषयक प्रगती केल्याने देशातील या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाने आज ५० वर्षांचा टप्पा गाठला आहे. या प्रकल्पाला अनेक आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळाले आहेत.

या अणुऊर्जा प्रकल्पातील चिरतरुण अणुभट्टय़ा म्हणजे जुन्या पिढीतील सर्वाधिक काळ कार्यरत असलेले ऊर्जास्रोत आहेत. त्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक आहे.  परदेशी तंत्रज्ञानाचे साहाय्य मिळणे बंद झाल्यानंतर देशातील शास्त्रज्ञ या प्रकल्पात येणाऱ्या अडचणींना सामोरे गेले. समृद्ध युरेनियमच्या उपलब्धतेच्या र्निबधांवरही तोडगा काढण्यात आला असून कालानुरूप या अणुभट्टय़ांमध्ये तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे २०११ मध्ये त्सुनामीनंतर फुकुशिमा (जपान) येथील अणुऊर्जा प्रकल्पातील दुर्घटनेनंतर अरबी समुद्रालगत असलेल्या तारापूर प्रकल्पात आवश्यक त्या सुधारणा आणि नवी सुरक्षा प्रणाली उभारण्यात आली.

देशात सध्या ६७८० मेगावॉट अणुऊर्जेची निर्मिती होत असून सध्या तारापूरच्या दोन्ही प्रकल्पांतून ३२० मेगावॉट वीज उत्पादन होत आहे. ही वीज गुजरात आणि महाराष्ट्राला दोन रुपये सहा पसे इतक्या माफक दराने दिली जाते. प्रकल्पातील अणु इंधन पुनर्भरण प्रक्रिया किमान वेळेत पूर्ण करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. उत्पादन सातत्य, कौशल्य आणि सुरक्षाविषयक कामगिरीची दखल घेऊन या प्रकल्पाला अनेक राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले. या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्य़ाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली.

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प १ आणि २ला आज, २८ ऑक्टोबर २०१९ रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. दिवाळीची सुट्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भरगच्च कार्यक्रमांमुळे प्रकल्पाचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम डिसेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. याविषयी तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

अणुभट्टय़ांच्या तारुण्याचे रहस्य

कालानुरूप या अणुभट्टय़ांमध्ये तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नवी सुरक्षा प्रणालीही उभारण्यात आली. अणुभट्टय़ांमध्ये असलेल्या ‘सॅम्पल कुपन’चे नियमित परीक्षण करून या ‘न्यूक्लियर रिअ‍ॅक्टर’च्या आयुष्यमानाचे परीक्षण केले जाते. या अणुभट्टय़ाचे आयुष्य ६० इफेक्ट फुल पॉवर इअर्स इतके आहे. दोन्ही अणुभट्टय़ा दीर्घकाळ वीज उत्पादन करत राहतील, असा अभिप्राय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियामक संस्थांनी दिला आहे.

अणुऊर्जानिर्मितीचा प्रवास

* मे १९६४ मध्ये अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीने तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची उभारणी सुरू केली.

* २८ ऑक्टोबर १९६९ या दिवशी प्रकल्पातून व्यावसायिक तत्त्वावर अणुऊर्जेची निर्मिती सुरू झाली.

* बॉयलिंग वॉटर रिअ‍ॅक्टर (बीडब्ल्यूआर) पद्धतीच्या दोन अणुभट्टय़ा २१० मेगावॉट वीज उत्पादन सुरू झाले.

* १९८४ मध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अणुभट्टय़ांची उत्पादन क्षमता १६० मेगावॉटपर्यंत घटविली. सध्या या अणुभट्टय़ांतून पूर्ण क्षमतेने ऊर्जानिर्मिती सुरू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 12:54 am

Web Title: fifty year complete tarapurs nuclear power plant abn 97
Next Stories
1 कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
2 विधानसभेत रायगडचे चार नवीन चेहेरे
3 अमरावती : नवनीत राणांना शिवीगाळ?; रवी राणा आणि शिवसेना जिल्हाप्रमुखांमध्ये राडा
Just Now!
X