14 October 2019

News Flash

व्हॉट्स अॅेपवरील छायाचित्रे काढून टाकल्याने एकास मारहाण

राहुल चंद्रहास शिरसाट याच्या वाढदिवसाची छायाचित्रे नितीन बाळासाहेब शेलार (२९)  पेंटर याने नितीन शेलार मित्र मंडळ या व्हॉट्स अ‍ॅप  ग्रुप वरून डिलिट केली.

प्रतिकात्मक छायाचित्र

व्हॉट्स अ‍ॅपवरून वाढदिवसाची छायाचित्रे डिलिट करणाऱ्या तरुणास १४ ते १५ जणांकडून बेदम मारहाण केल्याची घटना अहमदनगरमधील कोपरगाव येथे घडली. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिसात १४ ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१० मे रोजी राहुल चंद्रहास शिरसाट याच्या वाढदिवसाची छायाचित्रे नितीन बाळासाहेब शेलार (२९)  पेंटर याने नितीन शेलार मित्र मंडळ या व्हॉट्स अ‍ॅप  ग्रुप वरून डिलिट केली. याचा राग येऊ न राहुल चंद्रहास शिरसाट याने हातातील लोखंडी गजाने नितीन शेलार यांच्या पाठीवर, पायाच्या नडगीवर वार करून जखमी केले. तसेच कैलास सीताराम सोमासे, अक्षय भालेराव,  सुनील बाबुराव मोकळ, रवी वावळ राहुल खंडीझोड,  संतोष होतीस यासह इतर अनोळखी चारपाच जणांनी सोमवार, १३ रोजी दुपारी ३.३० वाजता खडकी येथील सुरेश कदम यांच्या किराणा दुकानासमोर नितीन शेलार यास सर्वानी मिळून बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.  उपचारासाठी त्याला कोपरगाव ग्रामीण रुग्णालय व नंतर  श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी  येथे दाखल करण्यात आले आहे.  नितीन शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील १४ ते १५ जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on May 15, 2019 5:37 pm

Web Title: fight over photos on whatsapp in ahmednagar