23 September 2020

News Flash

दोघांनी परस्परांच्या श्रीमुखात भडकावली!

साध्या वेशात डय़ुटी का करतो या कारणावरून राहाता पोलीस ठाण्यातील नाईक व कोपरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्यात शिवीगाळ, बाचाबाची होऊन दोघांचाही राग अनावर झाल्याने या

| June 19, 2014 02:58 am

साध्या वेशात डय़ुटी का करतो या कारणावरून राहाता पोलीस ठाण्यातील नाईक व कोपरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्यात शिवीगाळ, बाचाबाची होऊन दोघांचाही राग अनावर झाल्याने या दोघांनीही एकमेकांच्या श्रीमुखात लगावल्या. राहाता पोलीस ठाण्यात मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्याने खळबळ उडाली आहे.
मंगळवारी रात्री कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांना उत्तर नगर जिल्ह्याची रात्रीची गस्त होती. त्यांनी मध्यरात्री दीड वाजता राहाता पोलीस ठाण्यास भेट दिली. या वेळी वायरलेस डय़ुटीवर पोलीस नाईक काकड हे साध्या वेशात होते. याबाबत जाब विचारताच दोघांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली. या वेळी सोनवणे यांनी पोलीस नाईक काकड यांना शिवीगाळ केली. त्यामुळे दोघांमधील वातावरण एकदम बिघडले. शिवीगाळीला आक्षेप घेत काकड यांनी नियमानुसार कारवाई करा असे सांगताच सोनवणे यांच्यातील अधिकारी जागा झाला. त्यांनी लगेचच काकड यांच्या श्रीमुखात भडकावली. या प्रकाराने संतापलेल्या काकड यांनीही नंतर सोनवणे यांच्या श्रीमुखात भडकावली. उपस्थित ठाणे अंमलदाराने मध्यस्थी करून ही मारामारी सोडवली. रात्रीची वेळ असल्याने झालेल्या प्रकारावर पांघरूण टाकण्यात आले. मात्र सोनवणे यांनी पोलीस डायरीत या प्रकाराची नोंद घेतल्याने हा प्रकार उघडकीस आला.
सोनवणे यांनी राहाता पोलीस ठाण्याच्या डायरीमध्ये पोलीस कर्मचारी काकड याने आपल्याशी गैरवर्तन केले. त्याचा रिपोर्ट वरिष्ठांकडे सादर करावा अशी नोंद घेऊन त्याबाबत पोलीस नियंत्रण कक्षालाही त्यांनी त्याच वेळी कळवले. ख-या प्रकाराची नोंद मात्र त्यांनी पोलीस डायरीत घेतली नाही. या प्रकाराची शहरात चर्चा सुरू झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 2:58 am

Web Title: fighting between police officer employee 2
Next Stories
1 नगर शहरासाठी महिनाभराचाच पाणीसाठा
2 नगर शहरासाठी महिनाभराचाच पाणीसाठा
3 उस्मानाबादेसह तुळजापूर, उमरग्यात मृग बरसला
Just Now!
X