News Flash

चिंतन शिबिरातच सोलापुरात मारामारी

सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवानंतर बोलविण्यात आलेल्या चिंतन शिबिरातच आज कार्यकर्त्यांमध्ये मारामारीची घटना घडली. या मारामारीत एक कार्यकर्ता जखमी झाला, तर खुर्च्यांची मोठय़ा प्रमाणात तोडफोड करण्यात

| May 24, 2014 04:20 am

सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवानंतर बोलविण्यात आलेल्या चिंतन शिबिरातच आज कार्यकर्त्यांमध्ये मारामारीची घटना घडली. या मारामारीत एक कार्यकर्ता जखमी झाला, तर खुर्च्यांची मोठय़ा प्रमाणात तोडफोड करण्यात आली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवानंतर शहर काँग्रेसतर्फे आज येथील एका सभागृहात चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कोँग्रेस शहराध्यक्ष धर्मा भोसले यांच्यावर काही कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप केला. यातून भोसले आणि शिंदे समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. याचे पर्यावसन मारामारीत झाले. या वेळी एकमेकांवर खुच्र्याची मोठय़ा प्रमाणात फेकाफेक करण्यात आली. या हाणामारीत अनेक कार्यकर्त्यांना मार बसला, ज्यामध्ये शिंदे यांचे समर्थक केशव इंगळे जखमी झाले.
 
चिंतन शिबिरातच

सोलापुरात मारामारी

प्रतिनिधी, सोलापूर

सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवानंतर बोलविण्यात आलेल्या चिंतन शिबिरातच आज कार्यकर्त्यांमध्ये मारामारीची घटना घडली. या मारामारीत एक कार्यकर्ता जखमी झाला, तर खुच्र्याची मोठय़ा प्रमाणात तोडफोड करण्यात आली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवानंतर शहर काँग्रेसतर्फे आज येथील एका सभागृहात चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कोँग्रेस शहराध्यक्ष धर्मा भोसले यांच्यावर काही कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप केला. यातून भोसले आणि शिंदे समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. याचे पर्यावसन मारामारीत झाले. या वेळी एकमेकांवर खुच्र्याची मोठय़ा प्रमाणात फेकाफेक करण्यात आली. या हाणामारीत अनेक कार्यकर्त्यांना मार बसला, ज्यामध्ये शिंदे यांचे समर्थक केशव इंगळे जखमी झाले.

——-

फोटो – २३ सोल १

बैठकीत झालेल्या मारामारीत काही कार्यकर्ते जखमी झाले तर खुच्र्याची मोठय़ा प्रमाणात तोडफोड करण्यात आली. (छाया – संतोष गोरे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 4:20 am

Web Title: fighting in congress meditation camp of solapur
टॅग : Solapur
Next Stories
1 विविध खोदकामांमुळे सांगलीतील रस्त्यांची चाळण
2 राष्ट्रवादीचे आत्मचिंतन; जिल्हय़ात तिघांचे तीन अहवाल
3 जिल्हा परिषदेमधील ई – निविदा प्रक्रियेच्या चौकशीची मागणी
Just Now!
X