इंदुरीकर महाराज यांनी गर्भलिंग चाचणी कायद्याचा भंग केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार बठकीत केली.

त्यांनी सांगितले, की कीर्तन करीत असताना चेष्टा, मस्करी, विनोद करणारे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यात विकृत लक्षणे दिसतात. त्यांच्या कीर्तनाची ध्वनिचित्रफीत युटय़ूबवर अपलोड करण्यात आली असून यामध्ये त्यांनी पुत्र प्राप्तीसाठी दिलेला संदेश आहे. त्यांनी केलेले वक्तव्य संविधानविरोधी आणि अशास्त्रीय आहे. त्यांचे विधान पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंधन असून त्यांच्या कीर्तनातून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी वक्तव्ये दिसून येतात. महिलांची अवहेलना व द्बेष ते करतात.

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
uddhav balasaheb thackeray criticized mahayuti candidate sandipan bhumre
मद्य परवान्यांचा विषय ठाकरे गटाकडून ऐरणीवर; उमेदवारी जाहीर होताच भुमरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त

काय म्हणाले होते इंदुरीकर?

अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ओझर येथे झालेल्या किर्तनात ” सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” असे वक्तव्य केलं होते. इंदुरीकर महाराज यांनी केलेले वक्तव्य हे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला. पीसीपीएनडीटी च्या सल्लागार समितीने इंदुरीकर यांना नोटीस पाठवली आहे. इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी खुलासा मागितला आहे. नोटीस बजावल्यानंतर जर पुरावे आढळले तर गुन्हा दाखल करण्यात येईल असंही पीसीपीएनडीटीच्या सदस्यांनी म्हटलं आहे.