22 September 2020

News Flash

आंबे येथील विषबाधेप्रकरणी पुजा-याविरुद्ध गुन्हा दाखल

पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे दर्लिग मंदिरात महाप्रसादातून झालेल्या विषबाधेप्रकरणी मंदिराचे पुजारी राजाराम विठोबा पुजारी यांच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

| May 11, 2014 03:19 am

पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे दर्लिग मंदिरात महाप्रसादातून झालेल्या विषबाधेप्रकरणी मंदिराचे पुजारी राजाराम विठोबा पुजारी यांच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेत दीपक शिंदे या तरुणाचा मृत्यू झाला होता, तर अन्य सुमारे १८० भाविकांना विषबाधा झाली होती. यात ५४ रुग्णांवर पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, ८३ जणांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सर्वोपचार शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
आंबे येथे श्री दर्लिग मंदिरात राजाराम पुजारी यांनी धार्मिक विधी पूर्ण करून महाप्रसादाचे आयोजन केले होते. गावातील जवळपास सर्व व्यक्तींनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता. परंतु नंतर लगेचच सर्वांना विषबाधा झाली होती. राजाराम पुजारी यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2014 3:19 am

Web Title: filed a case against worshiper food poisoning case in ambe
टॅग Solapur
Next Stories
1 महिलांचा भार हलका करण्यासाठी ‘जलदूत’
2 दोघांना अटक, १३ पर्यंत पोलीस कोठडी
3 १२९ जवानांची तुकडी सैन्यात दाखल
Just Now!
X