जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांची ग्वाही

हर्षद कशाळकर, अलिबाग

देशासाठी १९७१ साली युध्दात सहभागी झालेल्या माजी सनिकावर हक्काच्या जागेसाठी संघर्ष करण्याची वेळ आल्याबाबतचे वृत्त लोकसत्ताने २१ जुनच्या अंकात प्रसिध्द केले होते. हक्काच्या जागेसाठी माजी सनिकाचा संघर्ष या मथळ्याखाली प्रसिध्द झालेल्या या वृत्ताची रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सरुयवशी यांनी गंभीर दखल घेतली आहे.  देशासाठी लढणाऱ्या आणि जखमी झालेल्या विठोबा परबळकर यांना सात दिवसात जागा उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

विठोबा  मारूती परबळकर हे भारतीय सेना दलात कार्यरत होते, १९६३ साली सेनेत दाखल झालेल्या परबळकरांनी १९७१ साली झालेल्या युध्दात देशासाठी सहभाग घेतला होता. यावेळी बॉम्ब १०२ बॉम्बे इजिनिअर रेजिमेंट मध्ये ते कार्यरत असतांना युध्दातील बॉम्ब हल्ल्यात ते जखमी झाले होते. युध्दात बजावलेल्या शौर्याची दखल घेऊन त्यांना १९७३ साली शासनाने माणगाव तालुक्यातील रिळे पाचोळे येथे सात एकर जागा दिली होती. २२ वर्ष देश सेवा करून विठोबा परबळकर निवृत्त झाले. गावाकडे आले पण आजारपणामुळे त्यांना पुन्हा मुंबईत परतावे लागले. २०१७ साली जेव्हा ते परत गावाकडे तेव्हा त्यांनी आपल्या जागेची मोजणी करून घेतली. तेव्हा त्यांच्या जागेत काही अतिक्रमणे झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.  ही अतिक्रमण हटवावी यासाठी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा सुरु केला. मात्र तीन वर्षांनंतरही त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. जिल्हाधिकारी यांनी सदर अतिक्रमणे हटवून जागा परबळकरांच्या ताब्यात द्यावी असे  निर्देश दिले होते. पण स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्या निर्देशांकडे डोळेझाक सुरु  होती. याबाबतचे वृत्त लोकसत्ताने २१ जूनच्या अंकात प्रसिध्द केले होते.

या वृत्ताची रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी गंभीर दखल घेतली. सुरवातीला परबळकर यांच्या जागेत झालेली अतिक्रमण तातडीने हटविण्याचे निर्देश त्यांनी माणगावचे प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांना दिले, मात्र स्थानिकांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध केला. त्यामुळे जिल्हाधिकारी शुक्रवारी सर्व संबधित प्रशासकीय यंत्रणा, स्थानिक ग्रामस्थ आणि परबळकर कुटूंबियांची संयुक्त बैठक घेतली. या बठकीत विठोबा परबळकर यांना सात दिवसात नवीन जागा देण्याचे निश्चित करण्यात आले. तीन दिवसात परबळकर यांनी त्यापरीसरात उपलब्ध असलेल्या जागांची पहाणी करून जागा निश्चित करावी आणि जागा निश्चिती झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने शासनाकडे कागदपत्रांची जागामागणीचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा. असे निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत.

‘या संदर्भात गुरुवारी सर्व संबधीत प्रशासकीय यंत्रणाची मी बैठक घेतली. स्थानिकांशी चर्चा केली. विठोबा परबळकर यांना सात दिवसात जागा उपलब्ध करून दिली जाईल.’

– डॉ. विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी रायगड</strong>