“असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गयी देखो और सुधार करो” असं म्हणत अर्थसंकल्प वाचत असताना अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाला टोला लगावला. अजित पवार जेव्हा बजेट सादर करण्यासाठी उभे राहिले तेव्हा जनतेचा कौल मिळाल्याने आम्ही सत्तेत आलो असा उल्लेख त्यांनी केला. त्यावेळी भाजपाच्या आमदारांनी गोंधळ घातला. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी काय तरतुदी केल्या हे सांगत असताना अजित पवार यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळींचा उल्लेख केला आणि भाजपाला टोला लगावला.

आणखी वाचा- सरकार आणि अर्थसंकल्पाचा हा अजब योगायोग

“असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गयी देखो और सुधार करो” अपयश हे एक आव्हान आहे ते स्वीकारा आणि काय कमतरता राहिली याचा विचार करा आणि त्याप्रमाणे सुधारणा करा असा या ओळीचा अर्थ आहे. विशेष बाब ही की हरिवंशराय बच्चन यांच्या याच कवितेतील शेवटच्या ओळींचा उल्लेख फडणवीस करत. कोशीश करनेवालोकी कभी हार नहीं होती या त्या ओळी आहेत. याच कवितेच्या सुरुवातीच्या ओळी वाचून अजित पवारांनी भाजपाला टोला लगावला आहे.