25 January 2021

News Flash

फडणवीस सरकारच्या काळात बेसुमार पैसै वाटप : जयंत पाटील

तत्कालीन फडणवीस सरकारवर कॅगने ताशेरे ओढले आहेत.

संग्रहित छायाचित्र

तत्कालीन फडणवीस सरकारवर कॅगने ताशेरे ओढले आहेत. राज्यात २०१८ पर्यंत झालेल्या ६६ हजार कोटी रुपयांच्या कामांचा ताळमेळ नसल्याचा संशय कॅगने अहवालात व्यक्त केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना अर्थमंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस सरकारच्या काळात बेसुमार पैसेवाटप झाल्याचं म्हटलं आहे. दिलेल्या कामांमध्ये नगरविकास खात्याची कामं जास्त होती. त्यासाठी पाहिजे तसं पैशांचं वाटप करण्यात आल्याचं पाटील म्हणाले.

तत्कालिन फडणवीस सरकारच्या काळात जी कामं पूर्ण झाली त्या कामांचं सर्टिफिकेटही घेण्यात आलं नाही. या कामांचे ६६ हजार कोटी रूपये कुठे गेले हेदेखील माहित नाही. जर हे पैसे योग्यरित्या खर्च करण्यात आले तर त्या कामांची सर्टिफिकेट का नाही, असंही पाटील म्हणाले. जर काही घोटाळे झाले असतील तर त्याची चौकशी करावी लागेल. आमचं सरकार काही चौकशी सरकार माही. जे मुद्दे कॅगनं मांडले ते पहावे लागतील, असंही ते म्हणाले.

तत्कालीन फडणवीस सरकारवर कॅगने ताशेरे ओढले आहेत. राज्यात २०१८ पर्यंत झालेल्या ६६ हजार कोटी रुपयांच्या कामांचा ताळमेळ नसल्याचा संशय कॅगने अहवालात व्यक्त केला आहे. एखादे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र १२ महिन्यांच्या आत सादर करायचं असतं. काम योग्यरित्या झाल्याचे ते प्रमाणपत्र असते. मात्र २०१८ पर्यंत झालेल्या विविध कामांसाठी दिलेल्या अनुदानांची उपयोगिता प्रमाणपत्रं नसल्याचंही कॅगने अहवालात नमूद केलं आहे. २०१८ पर्यंतच्या कालावधीत ६५ हजार ९२१ कोटी रुपयांच्या कामांची ३२ हजारांपेक्षा जास्त उपयोगिता प्रमाणपत्र सादर झालेली नाहीत असं कॅगने म्हटलं आहे.

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाचं सरकार सत्तेत आलं होतं. फडणवीस सरकारच्या कामाचा लेखाजोखा कॅगने मांडला आहे. कॅगच्या या अहवालात फडणवीस सरकारवर ठपका ठेवण्यात आला आहे. ६६ हजार कोटींच्या खर्चाचा ताळमेळ नाही असं कॅगने अहवालात म्हटलं आहे. केंद्र सरकारकडून येणारं अनुदान घटल्याचंही कॅगने म्हटलं आहे. गेल्यावर्षी ११ टक्के अनुदान आलं होतं ते प्रमाण आता ९ टक्क्यांवर आल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

कॅगने काय सूचना दिल्या आहेत?

राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या तोट्याची महामंडळं एकतर बंद करा किंवा पुनर्जिवीत करा

भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खर्च वाढत असल्याचंही निरीक्षण कॅगने नोंदवलं

अपूर्ण जलसिंचन प्रकल्प लवकर पूर्ण करा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 11:26 am

Web Title: finance minister jayant patil speaks about cag fadnavis government work winter session nagpur jud 87
Next Stories
1 बांगलादेश, पाकिस्तानातून आलेल्या मुस्लिमांना देशाबाहेर हाकला – राज ठाकरे
2 नव्या वर्षापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार- अजित पवार
3 “ओठास लाली व तोंडास पावडर लावून बसलेल्यांनी खिडकीही बंद करावी”
Just Now!
X