News Flash

‘अ‍ॅप’मार्फत आर्थिक जडणघडण

टाळेबंदीच्या काळात ‘मनी मेकिंग अ‍ॅप’चा वापर वाढला

(संग्रहित छायाचित्र)

घरबसल्या पैसे कमविण्याचे नवे मार्ग; टाळेबंदीच्या काळात ‘मनी मेकिंग अ‍ॅप’चा वापर वाढला

सुहास बिऱ्हाडे

टाळेबंदी दरम्यान निर्माण झालेली बेरोजगारी आणि आर्थिक टंचाई या पार्श्वभूमीवर पैसे कमविण्यासाठी नागरिक मनी मेकींग अ‍ॅपकडे वळू लागले आहेत. टाळेबंदीच्या काळात मनी मेकींग अ‍ॅपचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे.

करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च अखेरीपासून देशव्यापी टाळेबंदी लागू करण्यात आली होती. टाळेबंदीमुळे सर्वच नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे.  नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या, घरातून काम करणाऱ्यांचेही पगार अर्धे झाले. त्यामुळे आर्थिक ओढाताण सुरू झाली. आर्थिक उत्पन्नाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न झाला. त्यात अशावेळी सोप्प्या पद्धतीने अतिरिक्त उत्पन्न (साईड इन्कम) मिळविण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. डिजिटल माध्यमांवर उपलब्ध असलेले मनी मेकिंग अ‍ॅप वापरण्याकडे लोक वळू लागले आहेत.

असे पैसे मिळतात

मनी मेकिंग अ‍ॅपवर काही कामांचे थेट पैसे मिळतात तर बहुतांश कामांचे पॉईंटस मिळतात. अ‍ॅप डाऊनलोड करून साईन अप करणे, स्वत:चे प्रोफाईल पूर्ण भरणे, अ‍ॅपवर रोज हजेरी लावणे, दिले गेलेले सर्वेक्षण भरणे, खेळ खेळणे, व्हिडीओ किंवा जाहिराती पाहणे, सांगितलेले अ‍ॅप डाऊनलोड करणे, रेडिओ ऐकणे, प्रशनोत्तरे—गणिते सोडवणे, इतर दिलेले वेगवेगळे टास्क पूर्ण करणे, माहिती शेअर करणे आणि अ‍ॅप रेफर करणे अशा वेगवेगळ्या मार्गाचा त्यात समावेश आहे. काही ठिकाणी थेट पैसे मिळतात तर काही ठिकाणी पॉईंटस मिळतात. या पॉईंट्सचे रुपांतर पैशांमध्ये होते.

असा होतो कंपन्यांना फायदा

या अ‍ॅपच्या कंपन्या नागरिकांचा मिळालेला डेटा विकतात. गेम, सर्वेक्षण, रेडिओ, क्विझ इत्यादींना मंच उपलब्ध करून दिल्याचे भाडे आकारतात. विविध अ‍ॅपचे प्रमोशन करतात. तसेच जाहिराती मोठय़ा प्रमाणात मिळतात. यातून कंपनाला कोटय़ावधींमध्ये नफा मिळतो. असे ऑनलाइन एचआर विवेक सोनटक्के यांनी सांगितले.

विविध अ‍ॅप

‘एमपीएल’, ‘टॅपटॅप’, ‘ई—वॉर’, ‘बिग कॅश’, ‘बिग टाईम’, ‘झुपीगोल्ड’, ‘लोको’, ‘प्लेमेंट’ इत्यादी गेमिंग अ‍ॅप आहेत. ‘टाईमबक्स’, ‘पेडईरा’, ‘ग्रॅबपॉईंट’, ‘झुमबक’, ‘स्वॅगबक्स’, ‘बिटुरो’, ‘गुगल ओपिनियन रिवॉर्ड’ इत्यादी सर्वेक्षण अ‍ॅप आहेत. तर ‘मेकमनी’, ‘अर्नमनी’, ‘४फन’, ‘प्राईमकॅश’, ‘वनअ‍ॅड’, ‘पेबॉक्स’, ‘रोझधन’, ‘व्हीक्लिप’, ‘डेटाबडी’, ‘मॅथकॅश’, ‘पॉकेटमनी’, ‘मूकॅश’, ‘पर्कअ‍ॅप’, ‘रेडिओ अर्न’, ‘टॉपक्विझ’ इत्यादी अ‍ॅपमध्ये खेळ, सर्वेक्षण आणि इतर सर्व प्रकारची कामे असतात.

भारतामध्ये मार्च ते ऑगस्ट महिन्यांमध्ये पैसे कमावणाऱ्या अ‍ॅपचा रोजचा वापर ०.२ ते ०.४ टक्कय़ांवरुन १.६ ते १.८ टक्कय़ांवर गेला आहे. वापरकर्ती व्यक्ती दिवसातून कमीत १२ ते २० वेळा अ‍ॅप उघडते. तर दिवसातून कमीत कमी २ तास आणि जास्तीत जास्त ९ तास वापर होतो, म्हणजेच अ‍ॅपचा वापर पाचपटीने वाढला आहे. टाळेबंदीच्या काळात ऑनलाइन मिटींग, मनोरंजन, ई—पेमेंट अ‍ॅपसह पैसे कमावणारे अ‍ॅप सर्वाधिक डाऊनलोडेड अ‍ॅप ठरले आहे. भारतामध्ये दिवसाला साधारण ९ हजार ते २५ हजार वेळा अ‍ॅप डाऊनलोड झाल्याचे ट्रॅकींग सॉफ्टवेअरमध्ये दिसून आले, ही माहिती डिजिटल व्यावसायिक सल्लागार स्वागत रॉय यांनी दिली. प्ले स्टोअरवर अ‍ॅपच्या नावांचे अनेक बनावट अ‍ॅप आहेत. सुरुवातीला अ‍ॅप वापरून मगच स्वत:ची माहिती आणि तपशील भरावेत, असा सल्ला या क्षेत्रातील जाणकार अनुभव सहस्त्रबुद्धे यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 12:11 am

Web Title: financial integration through app abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 रायगडमध्ये करोनाचे ६४६ नवे रुग्ण
2 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना करोनाची लागण
3 न्यायालयाची जुनी इमारत करोना रुग्णांवरील उपचारांसाठी मिळावी म्हणून जलसमाधी आंदोलन
Just Now!
X