News Flash

कॉंग्रेस बंडखोराविरोधात मिरजेत गुन्हा; पावणेदोन लाख जप्त

मिरजेतील कॉंग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार चंद्रकांत सांगलीकर यांच्याविरोधात पैसे वाटल्याच्या आरोपावरून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

| October 14, 2014 02:16 am

मिरजेतील कॉंग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार चंद्रकांत सांगलीकर यांच्याविरोधात पैसे वाटल्याच्या आरोपावरून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमध्ये पोलीसांनी दोघांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून एक लाख ८७ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीवरून सांगलीकर यांच्याविरोधात मिरजेतील एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी अद्याप सांगलीकर यांना ताब्यात घेतले नसून, अधिक तपास करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 2:16 am

Web Title: fir against congress rebellion candidate in miraj
टॅग : Congress
Next Stories
1 सीमेवर हल्ले होत असताना, शेपूट घालून गप्प का?
2 वाजतगाजत प्रचार थांबला!
3 आता ‘लक्ष्मीदर्शना’ची लगबग!
Just Now!
X