News Flash

रविना टंडन, भारती सिंग आणि फराह खान यांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल

ख्रिस्ती बांधवांच्या भावना दुखावल्याचा आरोप

अभिनेत्री रविना टंडन, कॉमेडियन भारती सिंग आणि दिग्दर्शिका फराह खान यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ‘बॅक बेंचर्स’ या कार्यक्रमात ख्रिश्चन समाजातील धर्मग्रंथातील एका शब्दाचा अश्लील उच्चार केल्याचा आरोप ख्रिश्चन समाजाने केला आहे. रविना टंडन, भारती सिंग, फराह खान यांनी उच्चारलेल्या या शब्दाला ख्रिश्चन समाजांमध्ये मोठी प्रतिष्ठा आहे. मात्र त्यांनी त्याचा अश्लील भाषेत वापर केला असा आरोप अल्फा ओमेगा या संघटनेने केला आहे.

या कलाकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता देशभरातून होत असताना बीडच्या पोलीस ठाण्यात या तिन्ही कलाकारांविरोधात तक्रार देण्यात आली. या प्रकरणात तिन्ही कलाकारांना अटक करण्यात आली नाही तर त्यांच्या घरातून आम्ही त्यांना घराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा अल्फा ओमेगा संघटनेच्या वतीने देण्यात आला.

रविना टंडन, भारती सिंग आणि फराह खान यांनी एका कार्यक्रमादरम्यान ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी देशभरात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमात वापरेले शब्द धर्माचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा भाग ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. याआधी पंजाबमध्ये या तिघींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 9:53 pm

Web Title: fir against raveena tondon farah khan bharti sing in beed because of hurting christian community scj 81
Next Stories
1 करीनाला करायचाय तिच्यापेक्षा लहान तरुणासोबत रोमान्स
2 माधुरीने विकला मुख्यमंत्र्यांनी दिलेला बंगला
3 Photo : ‘मेकअप’मधील रिंकूचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?
Just Now!
X