जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन सावरगाव घाट (ता.पाटोदा) येथे दसरा मेळावा घेऊन गर्दी जमवल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, राज्यसभा सदस्य भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकरांसह पन्नास जणांविरुध्द अंमळनेर(ता.पाटोदा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट(ता.पाटोदा) येथे संत भगवानबाबांच्या जन्मस्थळी रविवार दि. 25 ऑक्टोंबर रोजी दसरा मेळावा झाला. दोन वर्षाची परंपरा असलेला मेळावा करोना महामारीमुळे ऑनलाईन झाला. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. मात्र यावेळी जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.

MLA Ganpat Gaikwads wife campaigns against Shinde attends rally with Vaishali Darekar
आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नीचा शिंदेंविरोधात प्रचार, वैशाली दरेकरांसोबत रॅलीत सहभागी
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
baramati lok sabha marathi news, sharad pawar reply to ajit pawar marathi news
शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार : म्हणाले, ‘तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही अवलाद…’

रविवारी रात्री उशिरा जिल्हा विशेष शाखेचे कर्मचारी किसन सानप यांच्या तक्रारीवरुन माजी मंत्री पंकजा मुंडे, राज्यसभा सदस्य भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार मेघना बोर्डीकर, आ.मोनिका राजळे, माजी आमदार भीमराव धोंडे, सविता गोल्हार, पाटोदा पंचायत समिती सभापती सुवर्णा लांबरुड, सरपंच राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे व इतर पन्नास जणांविरुध्द कलम 188, 269, 270 आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली